Monsoon Flu Vaccination : मान्सूनपूर्वी मुलांना द्या फ्लूची लस, राज्याच्या टास्क टीमने दिला सल्ला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनासह ब्लॅक फंगससारख्या आजारांनी धुमाकुळ घातला आहे. सोबतच महाराष्ट्रात तौक्ते वादळामुळे लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे सतत पावसाळी वातावरण आहे. पावसाळा आपल्या सोबत अनेक आजार घेऊन येतो. अशावेळी चिकित्सक आणि राज्य कोविड- 19 टास्क फोर्सने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवाहन केले आहे की, राज्यात मुलांना मान्सूनपूर्वी फ्लू ची लस दिली जावी. कारण कोरोना आणि फ्लूची सुरूवातीची लक्षणे जवळपास सारखी असतात. टास्क फोर्सचे म्हणणे आहे की, या खबरदारीच्या पावलाने संभाव्य संकटाची स्थिती टाळण्यास मदत होईल.

टास्क फोर्सचे सदस्य म्हणतात की, या पावलाने मुलांना जुने आजार आणि कॉमरेडिडिटीज (रूग्णामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त आजार किंवा वैद्यकीय स्थिती एकाच वेळी असणे) मध्ये मदत मिळेल, सीएम उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सकडून यावर आणखी स्पष्टीकरण मागितले आहे जसे की, असिम्प्टोमेटिक कोविड लक्षणे असलेली मुले व्हॅक्सीन घेऊ शकतात किंवा नाही. मुख्यमंत्र्यांनी हे सुद्धा आश्वासन दिले आहे की, टास्क फोर्सच्या सदस्यांद्वारे करण्यात आलेल्या शिफारसींवर विचार केला जाईल.

इंडिया टुडे टीव्हीने या मुद्द्यावर अनेक तज्ज्ञांशी चर्चा केली. खारघर येथील मदरहुड हॉस्पिटलचे कन्सल्टंट, पीडियाट्रिक्स अँड नियोनेटोलॉजीचे डॉ. सुरेश बिराजदार यांचे म्हणणे आहे की, फ्लूचे शॉट 6 महीने आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या सर्व मुलांना दिले पाहिजेत. ज्यामुलांना श्वसनसंबंधी आणि अस्थमा सारख्या समस्या आहेत, त्यांना सुद्धा लसीकरणामुळे लाभ होईल.

इन्फ्लुएंजा अणि कोविडचा संसर्ग (एक पेशीवर दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्हायरसचा संसर्ग) बहुतांश मुलांमध्ये दिसून येत आहे. या कोविड महामारीत निमोनियाचा धोका टाळणे आणि हॉस्पिटलमध्ये दाखल होणे टाळण्यासाठी इन्फ्लूएंजापासून बचाव खुप महत्वपूर्ण आहे. इन्फ्लूएंजाची लस घेतल्यानंतर इंजेक्शनच्या ठिकाणी वेदना आणि 2 दिवस हलका ताप असे काही सामान्य साइड इफेक्ट्स होतात. ही लस पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी आहे.