Monsoon Update | मान्सून बंगालच्या उपसागरात दाखल; जोरदार पावसाची शक्यता
पोलीसनामा ऑनलाईन – Monsoon Update | सध्या राज्यासह देशात उष्णतेचा पारा चांगलाच वाढला आहे. मान्सून कधी दाखल होणार याबाबत वाट बघितली जात आहे. अशातच हवामान विभागाकडून एक महत्वाची बातमी देण्यात आलेली आहे. (IMD)
मान्सून वेळेअगोदरच बंगालच्या उपसागरातील काही भागात पोहोचला आहे. तसेच आणखी चोवीस तासात तो वेळेपूर्वीच इतर भागात पोहोचेल असा अंदाज खात्याने वर्तविला आहे. सध्या बंगालच्या उपसागरात ‘रेमेल’ चक्री वादळाचे सावट असल्याने त्याठिकाणी खात्याकडून सतर्कतेचा इशारा दिला आहे.(Monsoon Update)
प. बंगालच्या काही भागात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर ओडिसा अंदमान निकोबार बेट, प. बंगाल या भागामध्ये वादळाचा धोका निर्माण झाल्याची माहिती देण्यात आलेली आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा