Monsoon Updates | मान्सूनचा श्रीलंकेतील मुक्काम वाढला; दोन दिवसात पुढील प्रवास होणार

पुणे : Monsoon Updates | देशात उष्णतेची लाट पसरली आहे. बुधवारी देशातील सर्वाधिक कमाल तापमान 48 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हे तापमान राजस्थान मधील बारमेरमध्ये होते. दरम्यान मान्सून कधी दाखल होणार अशी चर्चा सुरू आहे.

सध्या मान्सून श्रीलंकेपर्यंत दाखल झाला असून तिथे त्याने आपला मुक्काम वाढवला असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रात पुढील दोन दिवस दुपारी उष्णता तर सायंकाळी पाऊस अशी स्थिती असेल असे सांगण्यात आले आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दिनांक 22 दक्षिण अरबी समुद्र , मालदीवचा काही भाग, दक्षिण बंगालचा उपसागर , अंदमान आणि निकोबार च्या काही भागात प्रगती केली होती व तो तिथेच स्थिरावला होता. मान्सूनमध्ये अद्याप तरी प्रगती झालेली दिसून येत नाही परंतु मान्सून च्या पुढील वाटचालीसाठी पोषक वातावरण तयार झालेले आहे. (Monsoon Updates)

पुढील दोन दिवसांमध्ये मान्सून बंगालच्या उपसागराचा दक्षिणेचा काही भाग , अंदमान आणि निकोबार चा उर्वरित भाग , अंदमान समुद्र , श्रीलंकेचा काही भाग व्यापेल, असा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ujani Dam Backwater Boat Accident | उजनी जलाशय बोट दुर्घटनेतील बेपत्ता 6 पैकी 5 जणांचे मृतदेह सापडले, कुटुंबियांचा आक्रोश

Pune Crime Branch | पुणे : गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला अटक, दोन पिस्टल व चार राऊंड जप्त