मोदी सरकारला मोठा दिलासा ! कोरोनाची दुसरी लाट आली असताना MOODY’S नं अर्थव्यवस्थेबद्दल दिला सकारात्मक अंदाज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात कोरोनाने हाहाकार केला आहे. दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या वर्षी प्रमाणेच यंदाही लाट विस्तारली आहे. अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली असताना सुद्धा अर्थव्यवस्थेबद्दल भारताला एक दिलासा मिळाला असल्याचे समजते. यंदाच्या कोरोनाच्या लाटेचा परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसून येईल. परंतु गेल्या वर्षीच्या अर्थव्यवस्थेची तुलना पाहता GDP वाढीचा वेग हा दोन आकडी असेल असा स्पष्ट अंदाज मूडीजने वर्तविला आहे.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढत आहे. तर आर्थिक घडामोडीवरून मूडीजने म्हटले आहे की, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा परिणाम यंदाही दिसेल असे अर्थ क्षेत्रातील दिग्गज संस्था असणारी म्हटले आहे. तर त्यांनी देशातील अर्थव्यवस्थेबाबत दिलासा देणारे भाष्य केलं आहे. भारतात कोरोनाची दुसरी लाट गेल्या वर्षी आलेल्या पहिल्या लाटेपेक्षा अधिक भीषण आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी देशव्यापी टाळेबंदी करण्याऐवजी छोटे छोटे कंटेन्मेंट झोन तयार करण्यात यावे. तसेच, छोटे छोटे कंटेन्मेंट झोन तयार केले गेले, तर अर्थव्यवस्थेला बसणारा फटका मागील वर्षीच्या तुलनेत कमी असणार आहे. असे देखील मूडीजनं भाकीत केलं आहे.

या दरम्यान, देशात कोरोना मृत्यूदर कमी आहे. याशिवाय तरुणाची लोकसंख्या अधिक असल्याने कोरोना संकटाचा सामना करताना भारताला फायदा होणार आहे. मागील वर्षी लॉकडाऊनच्या काळामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला अधिक फटका बसला आहे. याची तुलना करता यावर्षी होणारं नुकसान कमी असणार आहे. जीडीपी (Gross domestic product) वाढीचा वेग दुपट्टीच्या संख्येत असणार आहे. असा अंदाज मूडीजनं व्यक्त केला आहे.