350 वर्षांपूर्वी स्वीकारला होता ‘इस्लाम’ धर्म, आता दफन करण्याची परंपरा सोडून पुन्हा बनले ‘हिंदू’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातून एक अशी घटना उघडकीस आली आहे, जिथे 350 वर्ष जुनी परंपरा सोडून मृतदेह दफन करण्याऐवजी दहन करून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, कुटुंबियांचे म्हणणे आहे की, औरंगजेबमुळे त्यांच्या वडिलांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता.

हिसार जिल्ह्यातील बिठमड़ा गावची ही घटना आहे, मृत व्यक्तीला दफन करण्याची 350 वर्षांची जुनी परंपरा सोडून वृद्ध महिला फूली देवीच्या मृत्यूनंतर तिच्या मृतदेहावर हिंदू परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. यापूर्वी इथे तीस कुटुंबातील लोक मृत्यूनंतर मृतदेह दफन करत होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला. वृद्ध महिलेच्या अंत्यसंस्कारास गावातील सर्व लोक उपस्थित होते. लोक म्हणतात की, अंत्यसंस्कार हिंदू रीति-रिवाजांनी केला गेला. लोकांनी सांगितले की, ते कोणत्याही दबावाशिवाय आणि स्वतःच्या इच्छेने ते स्वीकारत आहेत. वृद्ध महिलेचे नातेवाईक सतबीर आणि मनजीत यांनी सांगितले की, पूर्वीचे मृतदेह दफन करण्यात येत होते आणि जवळजवळ 350 वर्षांपासून हे केले गेले आहे.

लोक म्हणतात की, औरंगजेबाच्या काळापासूनच त्यांच्या वडिलांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता. पण आता आम्ही कोणत्याही दबावाविना घरवापसी केली आहे. आता त्यांनी दफन करण्याची परंपराही बदलली आहे. हे सर्व लोक डूम जातीचे आहेत. अंत्यसंस्काराच्या वेळी ही सर्व कुटुंबे गावात हजर होती. एकूण 30 कुटुंबांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला आहे.