धक्‍कादायक ! २ वर्षात ८०० हून अधिक हिंदू अन् ३५ मुस्लिमांनी केली धर्मांतराची मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी विधानसभेत सांगितले की राज्यात मागील २ वर्षांत ८६३ हिंदूंनी आणि ३५ मुसलमानांनी असे एकून मिळून ९११ लोकांनी धर्मांतरासाठी राज्य सरकारकडे अनुमती मागितली आहे.

मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी सांगितले की ९११ मध्ये ६८९ लोकांनी धर्मांतर करण्यासाठी अनुमती मागितली आहे. गुजरात विधानसभेचे अर्थसंकल्प सत्राची सुरुवात झाली आहे. काँग्रेस आमदाराने गृहविभागाकडून धर्म परिवर्तनाबाबत अर्ज करणाऱ्या लोकांची मागील २ वर्षातील माहिती मागवली होती. यालाच उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती सांगितली.

हिंदूची सर्वात जास्त संख्या –

रुपाणी यांनी पुढे सांगितले की, ९११ अर्ज करणाऱ्यामध्ये हिंदूंची संख्या ८६३ आहे तर मुसलमानांची ३५, ख्रिश्चनांची ११, खोजा धर्मातील १ आणि बौद्ध धर्मातील १ अशी आहे. त्यांनी सांगितले की धर्म परिवर्तन करणाऱ्यासाठी आलेले हिंदूंच्या अर्जांची सर्वाधिक संख्या सुरत (४७४) मधील आहे. तर त्यानंतर जुनागड (१५२), आनंद (६१) एवढ्या हिंदूंनी अर्ज केला आहे.

धर्मांतरासाठी घ्यावी लागणार परवानगी –

गुजरात धार्मिक स्वतंत्रता कायद्यानुसार जर कोणी व्यक्ती धर्मांतर करु इच्छित असेल तर त्यांना सरकारकडून संमती घेणे अनिवार्य आहे. बळजबरी धर्मांतर रोखण्यासाठी हा कायदा २००८ साली लागू करण्यात आला होता.

केवळ चवीसाठीच नाही तर, विविध आजारांसाठीही गुणकारी आहे ‘पुदिना’

सुंदर दिसायचय ? ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा

‘झटपट मेकअप’ करण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स

किडनी आणि ह्रदय विकारावर द्राक्ष आहेत गुणकारी

धनंजय मुंडें यांच्या अडचणी वाढ ; वंचितकडून ‘हा’ नेता निवडणुकीच्या रिंगणात

दलित तरुणावर प्रेम करणाऱ्या आदिवासी युवतीला अमानुष मारहाण