#Video : पुण्यात ‘सीलबंद’ बाटलीतील पाण्यात शेवाळ आढळल्याने ‘खळबळ’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आजकाल घराबाहेर पडल्यावर पाणी पिण्यासाठी सर्रास बाटलीबंद पाण्याचा वापर केला जातो. मात्र ते पाणी शुद्ध आहे कि दूषित याची फारशी माहिती घेतली जात नाही. पुण्यात बाटलीबंद पाण्यात चक्क शेवाळ आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबतची माहिती पुण्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी दिली आहे.

मिनरल वॉटरच्या नावाखाली सध्या विकल्या जाणाऱ्या बाटलीबंद पाण्याची जोरदार विक्री चालू आहे. बाटलीबंद पाण्याच्या नावाखाली अनेक कंपन्या पाण्याची विक्री करीत आहेत. बाटलीबंद पाणी खराब येऊ लागल्याने अशी बाटली घ्यावी की नाही याबाबत लोकांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांना बाटलीबंद पाण्यात शेवाळ आढळले. त्यामुळे बाटलीतील पाण्याचा रंग हिरवा झालेला दिसत आहे. दूषित पाणी असणाऱ्या बाटलीवर श्रीपाद ऑक्सीमिस्ट नाव असून पिंपरी-चिंचवडच्या चिखलीमध्ये या पाण्याचं उत्पादन केलं जात असल्याची माहिती बाटलीवर देण्यात आलेली आहे.

बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय आरोग्याशी संबंधित आहे. बेकायदेशीररीत्या सुरु असलेले पिण्याच्या पाण्याचे उद्योग ही मोठी समस्या आहे. बाटलीबंद हे शुद्ध असेलच याचीही खात्री देता येत नाही. शुद्ध पाण्याच्या या बाटलीबंद धंद्यात अशुद्ध पाण्याचाच अधिक प्रमाणात व्यवसाय असल्याचे दिसून आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त : 

कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

फुल फॅटच्या दुधामुळे मधुमेह व हृदयरोगाचा धोका होतो कमी !

स्वादीष्ट मोमोज आहेत सर्वात निकृष्ट खाद्यपदार्थ

त्याने १२० दिवसात कमी केले तब्बल ३० किलो वजन