Flashback 2019 : गूगलवर खूप सर्च झालं ‘कसे काढावेत होळीत लागलेले रंग’, ही आहे सर्चची संपूर्ण यादी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – साल 2019 हे वर्ष आता काही दिवसांमध्येच संपणार आहे. यावेळी गुगलने पूर्ण वर्षांत सर्वाधिक शोधल्या गेलेल्या विषयांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये क्रिकेट, वल्डकप, कबीर सिंह चित्रपट तसेच आधारला पॅन कसे लिंक करायचे अशा गोष्टींचा समावेश आहे. एवढेच नाही तर लोकांनी आपल्या आसपास घडणाऱ्या गोष्टींबाबत तसेच आपल्या आवडीच्या गोष्टींबाबत सर्च केले आहे.

गुगलकडून वर्षाच्या शेवटी अशा प्रकारची यादी जाहीर केली जाते. ज्यावरून लोकांच्या आवडीचे विषय कोणते होते याची माहिती मिळते. तर जाणून घेऊयात की, 2019 मध्ये सर्वाधिक कोणत्या गोष्टींना सर्च करण्यात आले.

गुगलवर या स्पोर्ट इव्हेंटला केले गेले सर्च
क्रिकेट वर्ल्ड कप 2019
प्रो-कबड्डी लीग 2019
कोपा अमेरिका
ऑस्ट्रेलिया ओपन
विंबलटन ऑपन

गुगलवर सर्वाधिक सर्च झाले हे चित्रपट
कबीर सिंह
एवेंजर्स एंडगेम
जोकर
कैप्टन मार्वेल
सुपर-30
मिशन मंगल
गली बॉय
वॉर
हाउसफुल 4
उरी

या घडामोडींना गुगलवर केले गेले सर्वाधिक सर्च
लोकसभा निवडणूक
कलम 370
चंद्रयान – 2
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
हरियाणा विधानसभा निवडणूक
साइक्लोन फानी
अयोध्या निकाल
ऍमेझॉन फॉरेस्ट फायर
पुलवामा हल्ला

या लोकांना गुगलवर केले गेले सर्च
लता मंगेशकर
युवराज सिंह
आंनद कुमार
विक्की कौशल
ऋषभ पंत
रानू मंडल
तारा सुतारिया
सिद्धार्थ शुक्ला
कोइना मित्रा

या प्रोसेसला गुगलवर सगळ्यात जास्त केले गेले सर्च
आधार आणि पॅनकार्ड लिंक
मतदारांचे नाव तपासणे
होळीचे रंग कसे काढायचे
मतदान कसे करायचे

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/