कलयुग ! सासूनं चक्क चारही मुलांसोबत संबंध ठेवण्यास भाग पाडलं, लहानग्याला दाखवलं अन् मोठ्याशी लावलं लग्न

गाझियाबाद : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातून (UP) रोज गन्हेगारीच्या विचित्र घटना समोर येत असतात. अशीच एक धक्कदायक व संतापजनक घटना गाझियाबादमधून ( ghaziabad) समोर आली आहे. एका १९ वर्षीय मुलीचे लग्न लहान भावाऐवजी मोठ्या भावासोबत लग्न लावून दिलं आणि नंतर सासूनेच तिला आपल्या चारही मुलांसोबत अवैध शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पडल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान पीडित महिलेने याची तक्रार गाझियाबाद डीएम यांच्याकडे केली.त्यानंतर सिहानी गेट पोलीस स्टेशनमध्ये महिलेचा पती आणि सासूसहीत ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे नवी नवरी जेव्हा लग्न होऊन आपल्या सासरी पोहोचली तेव्हा तिने तिच्या पती व्यतिरिक्त कुणासोबतही शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला. त्यावेळी तिच्यावर दबाव टाकत तिला मारहाणही करण्यात आली. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर ती माहेरी परतली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. शिवाय सासरच्या लोकांनी नवरीच्या आईकडे ट्रक घेण्यासाठी आणि बाइक घेण्यासाठी ३ लाख रूपयांची मागणी केली आहे अशी चर्चाही आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गाझियाबादच्या सिहानी गेट परिसरात १९ वर्षीय नवरी राहते. या मुलीची आई एका सोसायटीमध्ये काम करते. तिथे गार्डची नोकरी करणाऱ्या व्यक्तीच्या सांगण्यावरून मुलीच्या आईने तिचं लग्न मुरादनगरमधील एका मुलाशी जुळवलं. पण जेव्हा ती लग्न मंडपात पोहोचली तेव्हा ती दुसरीच व्यक्ती नवरदेव बनली होती.
नंतर समजलं की, जो मुलगा पाहिला होता आणि पसंत केला होता त्याचा हा मोठा भाऊ आहे. मुलीला या मुलासोबत लग्न करायचं नव्हतं. मात्र, वेळेवर आईच्या सांगण्यावरून ती लग्नासाठी तयार झाली. पीडितेनुसार, सासरी गेल्यावर समजलं की, तिच्या पतीला नशेची सवय आहे. पहिल्या रात्रीच तो इंजेक्शन घेऊन झोपला होता.

तिच्या पतीला २ मोठे भाऊ आणि एक लहान भाऊ आहे. दोन्ही मोठ्या भावांचं लग्न झालंय. तिच्या सासूने दुसऱ्या दिवशी मोठ्या मुलांना आणि लहान दीराला आळीपाळीने अवैध शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पाठवलं. मात्र ती विरोध करून रूममधून बाहेर आली, असे पीडित महिलेने सांगितले.

यासंदर्भात बोलताना सिहानी गेट पोलीस स्टेशनचे एसएचओ कृष्ण गोपाल शर्मा म्हणाले की, पीडितेची तक्रार दाखल करून घेतली आहे. पोलिसांनी प्रकरणाचा तपासही सुरू केला. पुराव्यांच्या आधारावर आरोपींवर कारवाई केली जाईल.