तिनं मुलांना वाचवलं पण तिचा जीव गेला, मुंबईच्या डोंगरीतील दुर्घटना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईत डोंगरी परिसरातील केसरबाई इमारत कोसळली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. त्यात ५० हुन अधिक जण या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त होत आहे. या दुर्दैवी प्रसंगात चांगली गोष्ट झाली आहे ती म्हणजे या ढिगाऱ्याखालून दोन मुलं बचावली आहेत. ही मुलं फक्त त्यांच्या आईच्या प्रसंगावधानामुळे वाचले आहेत.

सादिया नावाची ही महिला आपल्या कुटुंबासह तिसऱ्या मजल्यावर राहत होती. ती तिच्या मुलांसाठी नाश्ता आणण्यासाठी किचनमध्ये चालली होती. तेव्हा काहीतरी हालल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पटकन पळत जाऊन आपल्या मुलांना मांडीवर ओढून घेतले आहे. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही वेळात हा भाग कोसळला. तेव्हा ही मुले त्यांच्या आईच्या कुशीतच होती. इमारतीचा काही भाग कोसळल्यानंतर सादिया यांच्या अंगावर लोखंडी खांब कोसळला. तो घाव अंगावर झेलला पण आपल्या मुलांना अलगद ठेवले. या कोसळलेल्या खांबामुळे सादिया त्याच जागी मरण पावली. पण मुलांना काही होऊ नये म्हणून तिने मुलांना कुशीत सुखरुप ठेवले होते. त्यामुळे ही मुलं बचावली आहेत.

सादियाच्या प्रसंगसावधानतेमुळे तिची मुले वाचली पण तिनं मुलांच्या जीवासाठी स्वतःचे प्राण पणाला लावले. तर तीचा नवरा तेथे उपस्थित नसल्याने तो बचवला आहे. त्यामुळे या मुलांना या आईने दुसऱ्यांदा जन्म दिला असंच म्हणावे लागेल.

केसरबाई ही इमारत डोंगरी परिसरातील आहे. ही इमारत १०० वर्ष जुनी होती. या इमारतीत एकूण १५ कुटुंब वास्तव्यास होती. इमारत कोसळण्याची सकाळची वेळ असल्याने या कुटुंबातील सुमारे ५० लोक या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या लोकांना वाचवण्यासाठी यंत्राचा वापर न करता ढिगारा हातानेच बाजूला करण्याचे काम सुरु आहे.

आरोग्यविषयक वृत्त

पोटाची चरबी कमी न होण्याची ‘ही’ ९ मोठी कारणे, त्यासाठी ‘हे’ करा

वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खाऊ नका

मासिक पाळीच्या दरम्यान विचार पूर्वक निवडा वापरण्यात येणारी साधने

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी

चॉकलेट वॅक्सचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या