Motor Accident Tribunal Pune | तरुणाच्या अपघात प्रकरणी इन्शुरन्स कंपनीला दणका, मृत तरुणाच्या कुटुंबीयांना 1 कोटी 40 लाखांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Motor Accident Tribunal Pune | दुचाकीस्वार तरुणाच्या अपघाती मृत्यू प्रकरणात तरुणाच्या कुटुंबीयांना एक कोटी 40 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश मोटार अपघात न्यायप्राधिकरणाने दिले आहेत. मध्यस्थी यशस्वी समुपदेशन केल्याने दावा 14 महिन्यात निकाली निघाला.

पराग विजय कुलकर्णी असे अपघातात मृत्यू झालल्या तरुणाचे नाव आहे. 10 जानेवारी 2023 रोजी पराग त्यांच्या बुलेट गाडीवरुन बिबवेवाडी परिसरातून जात होते. त्यावेळी समोरुन आलेल्या एका भरधाव ट्रकने पराग यांच्या बुलेटला जोरात धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झाल्याने पराग यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करुन न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. (Motor Accident Tribunal Pune)

पराग यांची पत्नी स्नेहल, वडील विजय यांनी टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स (TATA AIG General Insurance) कंपनी विरोधात नुकसान भरपाईचा दावा मोटार अपघात न्यायप्राधिकरणात दाखल केला होता.
पराग एका नामांकित कंपनीत कामाला होते. त्यांना दरमहा 75 हजार रुपयांचे वेतन मिळत होते.
त्यांच्यावर पत्नी, मुलगी आणि वडील अवलंबून होते. त्यामुळे दीड कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी दाव्यात करण्यात आली होती.
या प्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायाधीश जे. जी. डोरल यांच्या न्यायालयात झाली.
त्यानंतर दावा मध्यस्थीसाठी अॅड. अतुल गुंजाळ यांच्याकडे पाठवण्यात आला. अर्जदार आणि विमा कंपनीत यशस्वी तडजोड झाली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai North Lok Sabha | उत्तर मुंबई मतदारसंघात मराठी-अमराठी हे प्रचारातील मुद्दे गोयल यांच्यासाठी त्रासदायक

Swargate Pune Crime news | खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीला स्वारगेट पोलिसांकडून अटक

Amit Shah | अमित शहांचा मोठा दावा, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले’ (Video)