वाढता लठ्ठपणा दूर होण्यासाठी चळवळ हवी : डॉ. जयश्री तोडकर

पुणे : पोलीसनामा आॅनलाईन

लठ्ठपणाचा वाढता आजार रोखण्यासाठी समाजात जागृती निर्माण होण्याची आणि त्या अनुषंगाने चळवळ उभारण्याची गरज आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध बॅरिअॅट्रीक सर्जन डॉ. जयश्री तोडकर यांनी केले. लहान मुलांमध्ये लठ्ठपणाचा आजार वाढत असल्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f119f0f5-c4af-11e8-8e3e-c775b1e12ba8′]

विश्वकर्मा प्रकाशनतर्फे डॉ. तोडकर आणि संतोष शेणई लिखित ओबेसिटी मंत्रा (लठ्ठपणा : आजार आणि उपचार) या पुस्तकाचे प्रकाशन त्रिपुराचे माजी राज्यपाल डॉ. डी.वाय.पाटील यांच्या हस्ते शनिवारी झाले. या प्रसंगी माजी उपमहापौर शंकरराव तोडकर, पत्रकार राजू परुळेकर, अभिनंदन थोरात, भरत अग्रवाल, विशाल सोनी हे व्यासपीठावर उपस्थित होते.

[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’faeda823-c4af-11e8-8cbf-81699f164c36′]

लठ्ठपणाबरोबरच मधुमेह, ह्रदयविकार, रक्तदाब, किडनीचे विकार असे आणि अन्य पावणे दोनशे आजार होतात. त्यामुळे वयोमान आणि गुणवत्तापूर्ण आयुष्य यात कमालीची घट होते म्हणून चळवळ उभारून समाजात जागृती करण्याची वेळ आली असल्याचे डॉ. तोडकर यांनी सांगितले.

७ हजार गुंतवणुकदारांना ४०० कोटींचा गंडा घालणाऱ्या टेम्पल रोझ कंपनीच्या संचालकांना अटक

दृढ निश्चयता, योग्य आहार, आणि चिंता दूर सारण्याच्या तंत्राचा अवलंब करून लठ्ठपणा दूर ठेवावा आणि आरोग्य सांभाळावे असे डॉ.पाटील म्हणाले. लठ्ठपणाविषयीचे समज, गैरसमज या पुस्तकामुळे दूर होतील असे थोरात म्हणाले. लठ्ठपणा दूर होण्याचा मार्ग जीम मधून नव्हे तर स्वयंपाकघरातून जातो असे सांगून स्वतःच्या तब्येतीबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपचारांची दिशा ठरविली पाहिजे असे परुळेकर म्हणाले.

जाहिरात