धुळे जिल्ह्यातच कृषी विद्यापीठ व्हावे यासाठी युवासेनेचे आंदोलन

धुळे : पोलीसनामा पोलीसनामा – कृषी विद्यापीठ धुळेकरांचा जिव्हाळ्याचा विषय असून याबाबत धुळे जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प बसलेले आहे. झोपेचे सोंग घेणाऱ्या ह्या लोकप्रतिनिधींना जागे करण्यासाठी व धुळे जिल्ह्यातच कृषी विद्यापीठ व्हावे यासाठी धुळे जिल्हा युवासेनेने महिनाभर आंदोलनाचा पवित्रा घेतला असून त्याची सुरवात संरक्षण मंत्री डॉ सुभाष भामरे यांच्या घराबाहेर घोषणा देऊन निर्दशने करण्यात आले.

उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यावर पूर्वीपासून अन्याय होत असून आतापर्यंत जिल्ह्याला लाभलेल्या नाकर्ते लोकप्रतिधींमुळे धुळे शहर जिल्ह्यासह मोठ्या प्रमाणात बेरोजगारी, गुंडगिरी, आरोग्याचे प्रश्न, शैक्षणिक प्रश्नांसोबत मूलभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव असून यास कारण धुळे जिल्ह्याचे लोकप्रतिधीं आहे. उत्तर महाराष्ट्रात धुळे जिल्हा मध्यवर्ती ठिकाणी असून तरीही धुळे जिल्हा आज विकासात मागासलेला असून एकाच जिल्ह्याला जास्त खाऊ-पिऊ घातले जात असून उत्तर महाराष्ट्रातील चारही जिल्ह्यांना समानता आणणे गरजेचे आहे.

धुळेकर बांधवांचा कोणत्या ही जिल्ह्याला विरोध नाही परंतु जे धुळे जिल्ह्याच्या हक्काचे आहे ते धुळे जिल्ह्याला मिळालेच पाहिजे ही भूमिका धुळेकर बांधवांची आहे. जिल्ह्याचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी कृषी विद्यापीठ धुळ्यातच आले पाहिजे यासाठी लोकप्रतिधींनी प्रयन्त करणे गरजेचे असतांना हे दुर्लक्ष करून नको त्या विषयांना हात घालताहेत. धुळे जिल्ह्यात वर्षभरात पंतप्रधान एकदा तर मुख्यमंत्री 4 ते 5 वेळा येऊन गेलेत परंतु केंद्रीय मंत्री व कॅबिनेट मंत्री यांच्या सह आमदारांनी ही कृषी विद्यापीठाचा विषय काढला नाही हे धुळे जिल्ह्याचे दुर्भाग्य आहे.

धुळेकरांनी यांच्यावर टाकलेला विश्वासावर हे लोकप्रतिनिधी सपशेल अपयशी ठरत असून कृषी विद्यापीठ भविष्यात धुळे जिल्ह्या व्यतिरिक्त ईतर जिल्ह्यात गेल्यास ते युवासेना होऊ देणार नाही पण झाल्यास धुळेकर जनता, शेतकरीं बांधव व युवक विद्यार्थीं या मंत्री-खासदार-आमदार यांना धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही. कृषी विद्यापीठ विषयात धुळे जिल्हा युवासेनेच्या माध्यमातून अनेक युवा-विद्यार्थी उतरले असून या लोकप्रतिधींना कृषी विद्यापीठासाठी प्रयन्त करण्यासाठी व त्यांना बोलके केल्या शिवाय युवासेनेचे आंदोलन थांबणार नाही आणि आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत जाईल.

असा ईशारा युवासेना जिल्हाप्रमुख ऍड.पंकज गोरे, देवपूर शहर प्रमुख हरीश माळी, उपशहरप्रमुख जितेंद्र पाटील, स्वप्नील सोनवणे, अमित खंडेलवाल, आकाश शिंदे, योगेश मराठे, प्रेम सोनार, निलेश चौधरी, भूषण पाटील, सागर मोरे, विनायक आवळकंठे, आशिष भडागे, आमीन शेख, कृष्णा पाटील व युवासैनिकांनी दिला आहे.