मंगळसूत्रांसोबत दिसला अर्जुन, करीना कपूर खानला विचारला प्रश्न

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   अभिनेता अर्जुन कपूर बॉलीवूडमधील नामांकित कलाकारांपैकी एक आहे. तो नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या टचमध्ये राहतो. याचा अभिनयदेखील चाहत्यांना खूप आवडतो. आज त्याच्या ‘की अँड का’ चित्रपटाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात करीना कपूर खानने अर्जुनबरोबर स्क्रीन शेअर केली होती, दोघांनी पती-पत्नीची भूमिका साकारली होती. चित्रपटाला पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर अर्जुनने एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याच्या हातात मंगळसूत्र दिसत आहे. हा फोटो शेअर करताना अर्जुनने चित्रपटाशी संबंधित आठवणी ताजा करत करीनाला एक प्रश्नदेखील विचारला आहे.

अर्जुन कपूरने चित्रपटाचे आईशी सांगितले कनेक्शन

अर्जुनने हि पोस्ट आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. हा फोटो शेअर करत अर्जुनने त्याच्या आईशी या चित्रपटाचे कनेक्शन सांगितले आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘की अँड का’ च्या आठवणींचा एक तुकडा. सेटला मिस करत आहे आणि ऑनस्क्रीनला देखील. हा चित्रपट माझ्यासाठी खूप पर्सनल होता, कारण हा मी माझ्या आईसाठी निवडला होता, पण अभिनेत्री करीना कपूर खान आणि बाल्की सरांसोबत काम केल्यानंतर आता हा चित्रपट आणखीच पर्सनल झाला आहे. मला वाटते की, आपल्याला याच्या सीक्वेलची गरज आहे. .काय म्हणते करीना ? ”

करीनाने इंस्टावर पोस्ट शेअर करत दिले उत्तर

अर्जुनबरोबर करीना कपूर खाननेही चित्रपटाला 5 वर्षे पूर्ण झाल्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून या चित्रपटाच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. तसेच अर्जुन आणि बाल्की बरोबर पुन्हा काम करण्याची इच्छा व्यक्त केली. फोटोत करीनासोबत अर्जुन आणि दिग्दर्शक पाहायला मिळत आहेत. फोटो शेअर करत करिनाने लिहिले, “एक चित्रपट जो मी खूप एन्जॉय केला, खूपच बोल्ड आणि वेगळा चित्रपट होता, त्यानंतर तैमूरचाही जन्म झाला होता. या चित्रपटाचा सिक्वल बनविलाच पाहिजे आणि यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे मला अर्जुन आणि बाल्की सोबत पुन्हा काम करायचंय. अर्जुन काळजी करू नकोस, मी तुला ‘चप्पल लाओ’ म्हणणे बंद करणार नाही. “यासह करिनाने हसणारा इमोटिकॉन शेअर केला.

अर्जुनचे आगामी चित्रपट

अर्जुनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास तो लवकरच ‘भूत पोलिस’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो अभिनेता सैफ अली खानसोबत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. याशिवाय अर्जुन कपूर ‘वन व्हिलन रिटर्न’ मध्येही दिसणार आहे, ज्याचे शूटिंगही सुरू झाले आहे. याबाबत अर्जुनने सोशल मीडियावर माहिती शेअर केली. दुसरीकडे, अर्जुन कपूर लवकरच संदीप और पिंकी फरार या चित्रपटात परिणीती चोप्रासमवेत महत्वाची भूमिका साकारणार आहे.