MP Bhavana Gawali | ‘पंतप्रधानांना राखी बांधली अन् ईडी थांबली’, उद्धव ठाकरेच्या टीकेला भावना गवळींचे प्रत्युत्तर म्हणाल्या-‘नातं टिकवता आलं नाही म्हणून…’

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे गटाचे (Thackeray Group) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हिंगोली येथे झालेल्या सभेत खासदार भावना गवळी (MP Bhavana Gawali) यांच्यावर टीका केली होती. पंतप्रधानांना राखी बांधली (Raksha Bandhan 2023) आणि ईडी (ED) थांबली, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भावना गावळींवर निशाणा साधला होता. ठाकरेंच्या टीकेला भावना गवळी (MP Bhavana Gawali) यांनी उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंना नात्यातील महत्व कळत नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.

गेल्या वर्षीचं रक्षाबंधन तुम्हाला आठवतं का? पंतप्रधानांना राखी बांधतानाचा एकच फोटो आला होता. पंतप्रधानांना राखी बांधली आणि ईडीची चौकशी थांबली, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भावना गवळी (MP Bhavana Gawali) यांच्यावर निशाणा साधला होता.

फडणीवसांसोबत ही गद्दारी केली

उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना भावना गवळी म्हणाल्या, उद्धव ठाकरे यांनी पवित्र नात्यावर सतत व्यक्तव्य केली आहेत. कदाचित उद्धव ठाकरे यांना नात्याचं महत्व कळत नसेल. राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे यांचं भांडणही कधीच संपलं असतं. मात्र, उद्धव ठाकरेंनी त्यावर निर्णय घेतला नाही. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबरोबरही त्यांनी गद्दारी केली.

ठाकरेंना नातं टिकवता आलं नाही

उद्धव ठाकरे यांना कधी नातं टिकवता आलं नाही. म्हणून ते सतत पवित्र बंधनावर बोलत असतात. उद्धव ठाकरे यांनी कधीही कोणाला चांगली वागणूक दिली नाही. 40 आमदार, 13 खासदार का सोडून गेले? याचं चिंतन त्यांनी केलं पाहिजे, अशी टीका भावना गवळी यांनी केली.

या बंधनावर ठाकरेंनी बोलू नये

भावना गवळी पुढे म्हणाल्या, मी पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले आहे.
माझ्या मतदारसंघात 24 वर्षापासून रक्षाबंधनाचा कार्यक्रम राबवत आहे.
अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee), लालकृष्ण आडवाणी (LK Advani) यांना राखी बांधली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनाही राखी बांधत आहे.
त्यामुळे या बंधनावर उद्धव ठाकरे यांनी बोलू नये. उद्धव ठाकरे यांनी कधीही बंधन पाळलं नाही.
म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली आहे, असा हल्लाबोल भावना गवळी यांनी केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Police Patil Recruitment | मावळ तालुक्यातील पोलीस पाटील पदांसाठी बुधवारी आरक्षण सोडत, 47 गावांसाठी होणार भरती

ACB Trap News | 1 लाख 30 हजार रुपये लाच घेताना गटविकास अधिकाऱ्यासह (BDO) तिघेजण अँन्टी करप्शनच्या जाळ्यात