MP Gajanan Kirtikar | ‘कारसेवकांवर गोळीबार, लालकृष्ण आडवणींना अटक करणाऱ्यांचं स्वागत…’, गजानन किर्तीकरांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी लोकसभा (Lok Sabha) आणि विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) पार्श्वभूमीवर आज आणि उद्या मुंबईत इंडिया आघाडीची बैठक (INDIA Alliance Meeting) होत आहे. या बैठकीसाठी ठाकरे गट (Thackeray Group), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) जोरदार तयारी करण्यात आली आहे. या बैठकीवरुन शिंदे गटातील (Shinde Group) खासदार गजानन किर्तीकर (MP Gajanan Kirtikar) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. ज्यांनी कारसेवकांवर गोळीबार केला, रथयात्रा काढणाऱ्या लालकृष्ण आडवाणींना (LK Advani) अटक केली त्यांचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) स्वागत करत आहेत, असं गजानन किर्तीकर (MP Gajanan Kirtikar) म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी किर्तीकर यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि पंतप्रधानपद यावरुन देखील टीका केली. या पत्रकार परिषदेला मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) उपस्थित होते.

हे घराणेशाही असलेले पक्ष

गजानन किर्तीकर (MP Gajanan Kirtikar) म्हणाले, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप (BJP) विरोधात मोदींना विरोध करण्यासाठी देशरभरात मोट बांधली जात आहे. त्याचं नाव ‘इंडिया’ असं ठेवलं आहे. पाटणा आणि बंगळुरुमध्ये बैठक झाल्यानंतर आज मुंबईत उद्धव ठाकरे या बैठकीची पोस्ट करतात. हे सर्व मिळून 26 पक्ष असून त्यामधील 17 पक्ष तर घराणेशाही असलेले पक्ष आहेत. त्यांचे स्वागत उद्धव ठाकरे करत आहेत.

शिवसेनेला काँग्रेसच्या ताटाखालचं मांजर केलं

किर्तीकर पुढे म्हणाले, स्वागत होणाऱ्यांमध्ये महबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti), फारूक अब्दुल्ला (Farooq Abdullah),
लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांचा समावेश आहे. बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray)
ज्या हिंदुत्वासाठी शिवसेना उभी केली, आज त्या शिवसेनेला काँग्रेसच्या ताटाखालचं मांजर करण्याचं काम उद्धव ठाकरे
करत आहेत. काँग्रेसने सावरकरांना (Swatantra Veer Savarkar) माफीवीर म्हणत विषारी टीका केली.
त्या राहुल गांधींना कोणताही जाब न विचारता आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे भारत जोडो यात्रेत
(Bharat Jodo Yatra) त्यांचे स्वागत करण्यासाठी गेले. त्यांची गळाभेट करायला जाणं हा विरोधाभास असल्याचे
मत किर्तीकर यांनी व्यक्त केलं.

राहुल गांधी दिशाहीन आणि नेतृत्वहिन नेतृत्व

हिंदुत्ववादाच्या (Hindutva) विरोधात भूमिका घेणाऱ्या, कारसेवकांवर गोळीबार करणाऱ्या समाजवादी पक्षाच्या नेत्यांना,
लालकृष्ण आडवाणी यांची रथयात्रा अडवून त्यांना तुरुंगात टाकणाऱ्या लालु प्रसाद यादव यांच्यासारख्या वृत्तीचे हे
स्वागत करत आहेत. राहुल गांधी दिशाहीन आणि नेतृत्वहीन नेतृत्व आहे. अशा राहुल गांधींना पंतप्रधान बनवण्यासाठी
उद्धव ठाकरे पायघड्या टाकत आहेत, अशी टीका गजानन किर्तीकर यांनी केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political News | ‘महाराष्ट्र द्रोह्यांच्या उष्ट्या पत्रावळ्या उचलताना…’ विरोधकांच्या बैठकीवरुन भाजपचा ठाकरे गटावर हल्लाबोल

Vijay Wadettiwar | शिंदे-फडणवीसांनी अजित पवारांची ‘पॉवर’ केली कमी; विजय वडेट्टीवारांचा टोला, ‘आता मुख्यमंत्र्यांना कळेल’