नेते, अधिकारी आणि हनी ट्रॅप ! ‘गोत्यात’ आलेल्या ‘त्या’ युवतीकडं मिळाले 90 ‘अश्‍लील’ व्हिडिओ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशच्या भोपाळमध्ये हनीट्रॅपचे रॅकेट उघड झाल्यानंतर समोर आले की या हनीट्रॅपच्या जाळ्यात अनेक मंत्री, अधिकारी, ठेकेदार, इंजिनिअर हे अडकले होते. या सौंदर्यांने भूरळ घालणाऱ्या तरुणींनी मंत्री, अधिकाऱ्यांचे छूप्या कॅमेरात अश्लील व्हिडिओ क्लिप तयार केल्या होत्या आणि असे चित्रण केले की हे व्हायरल केले तर त्यांची इज्जत जाईल. या सौदर्याच्या बुरख्या मागील चेहऱ्यांनी जवळपास 20 पेक्षा जास्त अधिकाऱ्यांना फसवले आहे. या प्रकरणाचा तपास एसआयटी करत आहे.

15 कोटीचा हनीट्रॅप –
5 सुंदर शिकारी, 20 शिकार, 90 रंगीत व्हिडिओ, 15 कोटीचा हनीट्रॅप. पोलिसांच्या तपासात उघड झाले की या तरुणींनी 20 पेक्षा जास्त लोकांना फसवले. यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांचा, सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे प्रकरण समोर आल्यावर धक्का बसला की या तरुणींनी 90 पेक्षा जास्त अश्लील व्हिडिओ आपल्या छुप्या कॅमेरातून कैद केले होते. यातील 30 व्हिडिओ नेते मंत्री असलेल्यांचे आहेत आणि आयपीएस आयएएस अधिकाऱ्यांचे आहेत. आरोपी तरुणींकडून पोलिसांना 90 व्हिडिओ बरोबरच 8 सिमकार्ड मिळाले. ज्याचा तपास आता सुरु आहे.

या अश्लील व्हिडिओच्या माध्यमातून या तरुणी मंत्र्यांना, अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करत असत आणि त्यांच्याकडून पैसे लुबाडत असतं. आतापर्यंत केलेल्या तपासात उघड झाले की आरोपी तरुणींनी 50 लाख रुपयांपासून 3 कोटी रुपयांपर्यंतची रक्कम लुबाडली आहे.

हा डर्टीगेम वर्षभरापासून सुरु आहे. यात भोपाळपासून इंदौरपर्यंतचे अनेक अधिकारी देखील आहेत. प्रकरण तेव्हा उघड झाले जेव्हा एका इंजिनिअरने या जाळ्यात अडकल्यानंतर पोलिसांना याबाबतची तक्रार दिली, त्या इंजिनिअरकडून 3 कोटी रुपयांंची मागणी करण्यात येत होती. त्यानंतर पोलिसांनी इंजिनिअरच्या मदतीने ब्लॅकमेलर महिलांना इंदौरला बोलावून घेतले आणि त्यांना ताब्यात घेतले.

असे करत होते ब्लॅकमेल –
हनी ट्रॅपमधील या महिला लेट नाइट पार्टीच्या शौकीन होत्या. त्यांच्या मोबाइलमधून दारू पार्टींचे अनेक व्हिडिओ मिळाले. अनेकदा शनिवारी रात्री हायवे पार्टीच्या नावाने त्या या पार्टी सीहोर बायपासच्या रिसोर्टमध्ये आणि मोठ्या हॉटेलमध्ये ठेवत असत आणि त्यात नेत्यांना, मंत्र्यांना, अधिकाऱ्यांना बोलवण्यात येत असे. या तरुणींच्या मोबाइलमध्ये मेसेज देखील मिळाले आहे. या आधारे पोलीस तपास करत आहेत.

Visit : policenama.com