हनी ट्रॅप केस : ललनांच्या डायरीतून अनेक ‘रहस्य’ आली समोर, डायरीचे 2 पानं झाली ‘व्हायरल’, सर्वत्र खळबळ

रायपूर : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील प्रसिद्ध हनी ट्रॅप प्रकरणाचे धागेदोरे छत्तीसगडमध्येही पोहोचले आहेत. छत्तीसगडचे 3 माजी मंत्री, 4 आयएएस आणि 1 आयपीएस अधिकारी आणि मीडिया हाऊसशी संबंधित ज्येष्ठ व्यक्तीची नावे या हाय प्रोफाइल  हनी ट्रॅप प्रकरणात समोर आली आहेत. या  प्रकरणात अडकलेल्या मध्य प्रदेशातील श्वेता या तरुणीकडून एसआयटीने डायरी जप्त केली आहे.

या डायरी पानाच्या सर्वात वर छत्तीसगडचे पक्षी ( छत्तीसगढ़ के पंछी) असं लिहलं आहे. हनी ट्रॅप प्रकरणात या डायरीचा मजकूर जसजसा वर येत आहेत तसतसे अधिकाधिक कारनामे उघडकीस येत आहेत. या डायरीतील पूर्ण मजकुर अद्याप स्पष्ट झाला नसला तरी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये तो  जोरदार व्हायरल होत आहे.


हनी ट्रॅप प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरती दयाल, मोनिका यादव यांची नावेही डायरीत आहेत. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात व्यवहार झाल्याची नोंद डायरीत आहे. हवालामार्फत ही रक्कम वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये वितरित करण्यात आल्याचे सांगण्यात येते. छत्तीसगडशी हनी ट्रॅप कनेक्शननंतर एसआयटीची टीम या मिळालेल्या माहितीच्या संशयाखाली कधीही चौकशी करू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. विभागीय अधिकारी डायरीत सापडलेल्या माहितीचे पडताळणी करण्यात व्यस्त आहेत.

या  डायरीतील काही नावे पूर्ण लिहली आहेत तर काही नावे कोडवर्ड आणि शॉर्टकटमध्ये लिहिलेली आहेत. त्यामुळे ती नावे ओळखण्यात  अडचण येत आहे. हनी ट्रॅपची तपासणी एजन्सी त्या नावांनी आश्चर्यचकित आणि विचलित झाली आहे.