प्रजासत्ताक दिनी पिता-पुत्राने केला मर्डर, किरकोळ वादातून ऑटो चालकाला मारली गोळी

इंदौर : पोलीसनामा ऑनलाइन –  मध्य प्रदेशच्या इंदौर शहरात एकीकडे जिथे शहरात प्रजासत्ताक दिन साजरा होत होता, तर दुसरीकडे कारमध्ये बसलेल्या पिता-पुत्राने गोळी मारून एका ऑटो रिक्षा चालकाची हत्या केली. त्याचा दोष केवळ इतकाच होता की, त्याच्या ऑटोने आरोपींच्या गाडीला किंचितशी धडक दिली होती. यानंतर दोन्ही आरोपींचा ऑटोवाल्याशी वाद झाला आणि काही वेळातच त्या दोघांनी आपल्या स्कोडा कारमध्ये ठेवलेली पिस्तूल काढून ऑटो चालकाच्या छातीवर गोळ्या मारल्या. यामुळे त्याचा मृत्यू झाला.

हृदयाचा थरकाप उडवणारी ही घटना इंदौरच्या खंडवा रोडची आहे. जिथे भंवरकुआ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खंडवा नाक्यावरून स्कोडा कारने पिता-पुत्र निघाले होते. तेव्हा त्यांच्या कारला एक ऑटो रिक्षा किंचितशी धडकली. यावरून ऑटो चालकाशी झालेल्या वादातून दोघांनी गोळ्या झाडून त्याची हत्या केली.

मृत ऑटो चालकाचे नाव लोकेश साळवे (27, खंडवा नाका, भावना नगर) होते. लोकेशच्या मृत्यूनंतर लोकांनी त्याच्या कुटुंबियांना कळवले. माहिती मिळताच त्याचा भाऊ घटनास्थळी आला आणि त्याला एका खासगी हॉस्पीटलमध्ये घेऊन गेला. परंतु हॉस्पीटलमध्ये पोहचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. घटनास्थळी असलेल्या लोकांनी कारचा नंबर नोट केला होता.

ज्याच्या आधारावर पोलिसांनी मारेकर्‍यांचा शोध सुरू केला. काही तासातच दोन्ही मारेकर्‍यांना अटक करण्यात आली. मारेकर्‍यांनी पोलिसांना सांगितले की, ते बाप-मुलगा असून गाडीच्या अपघातानंतर त्यांचा ऑटो चालकाशी वाद झाला होता. आता मारेकरी बाप-बेट्यांची पोलीस चौकशी करत आहेत.

अ‍ॅडिशनल एसपी राजेश व्यास यांनी सांगितले की, पोलिसांनी लोकेशचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. पोलिसांनी आरोपींची कार सुद्धा जप्त केली आहे. या घटनेमुळे इंदौर शहरात खळबळ उडाली आहे.