‘या’ 17 मोहर्‍यांनी ज्योतिरादित्यांना बनवलं ‘महाराज’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मध्य प्रदेशातील राजकारणात कालपासून अनेक घडामोडी घडत आहेत. त्यात काँग्रेसचे युवा नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानं मध्य प्रदेशातील राजकारणात राजकीय भूकंप पाहायला मिळत आहे. त्यात ज्योतिरादित्य समर्थक २२ आमदारांनीही राजीनामा दिल्यानं कलमनाथ सरकार पडणार असल्याचे जवळपास निश्चित झालं आहे. या दरम्यान, असे १७ मोहरे आहेत, ज्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांना महाराज बनविले. जाणून घेऊया या कोण आहेत ते १७ मोहरे…

१) रघुराजसिंह कंसाना :
मुरैना विधानसभा मतदारसंघाचे आमदार रघुराजसिंह कंसाना हे ज्योतिरादित्य शिंदे यांचे विश्वासू समजले जातात. गेल्या वर्षी कंसाना यांच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले होते.

२) राजवर्धनसिंह दत्तीगाव :
दत्तीगावचे आमदार राजवर्धनसिंह हे राजघराण्याशी संबंधित आहेत. त्यांनी सन २०१८ मध्ये कमलनाथ सरकारला विरोध करत राजीनामा दिला होता. ते कमलनाथ यांचे विरोधक आहेत.

३) सुरेध धाकड :
पोहारीचे आमदार सुरेश धाकड यांनी सन २०१८ मध्ये १० वर्षे भाजपचे आमदार राहिलेले प्रह्लाद भारती यांचा पराभव केला होता.

४) रक्षा संतराम सरौनिया :
भांदेरच्या आमदार रक्षा संतराम सरौनिया या ज्योतिरादित्यांच्या समर्थक आहेत. त्यांचे पती संतराम सरौनिया अनेकदा वादात सापडले आहेत.

५) हरदीपसिंह डंग :
मंदसौरच्या सुवासरा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार हरदीपसिंह डिंग यांनीच सर्वप्रथम राजीनामा दिला. मात्र, आपण कोणत्याही गटाचे नाहीत असे डंग यांनी म्हटले होते.

६) जजपालसिंह जज्जी :
जजपालसिंह जज्जी हे अशोकनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. सन २०१८ मधील विधानसभा निवडणुकीत जज्जी यांनी भाजपचे लड्डू राम यांचा पराभव केला होता.

७) कमलेश जाटव :
कमलेश जाटव हे अम्बाहचे आमदार आहेत. जाटव यांनी ट्रान्सजेंडर उमेदवाराचा अगदी कमी फरकाने पराभव केला होता.

८) इमरती देवी :
इमरती देवी या कमलनाथ सरकारमध्ये महिला आणि बाल विकास मंत्री होत्या. डाबरा विधानसभा मतदारसंघातून त्या सन २००८ पासून सतत निवडून येत आहेत.

९) ब्रजेंद्रसिंह यादव :
ब्रजेशसिंह यादव हे अशोक नगर जिल्ह्यातील मंगावली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. येथून काँग्रेसचे दिग्गज नेते महेंद्र सिंह कालुखेडा हे देखील आमदार होते.

१०) गिरिराज डंडोतिया :
गिरिराज डंडोतिया हे दिमानी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. गिरिराज हे ज्योतिरादित्य शिंदेच्या कट्टर समर्थकांपैकी एक आहेत.

११) प्रभुराम चौधरी :
प्रभुराम चौधरी हे शालेय शिक्षण मंत्री होते. व्यवसायाने डॉक्टर असलेले चौधरी हे सन १९८५ मध्ये पहिल्यांदा आमदार बनले. सांची विधानसभा मतदारसंघाचून ते तीन वेळा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले आहेत.

१२) महेंद्रसिंह सिसोदिया :
महेंद्र सिंह सिसोदिया हे कमलनाथ सरकारमध्ये कामगार मंत्री होते. ते बामरी विधानसभा मतदार संघातून दोन वेळा (२०१३ आणि २०१८ ) आमदार म्हणून निवडून आले आहेत.

१३) तुलसी सिलावट :
तुलसी सिलावट हे आरोग्य मंत्री होते. ते चारवेळा आमदार म्हणून निवडून आले. ते सानवेर विधानसभा मतदारसंघातून १९८५, २००८ आणि २०१८ मध्ये आमदार झाले. तुलसी सिलावट हे आरोग्यमंत्री होते. ते सावनेरचे आमदार आहेत.

१४) गोविंदसिंह राजपूत :
गोविंदसिंह राजपूत हे महसूल मंत्री होते. ते सुरखीचे आमदार आहेत. ते मध्य प्रदेशचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत.

१५) प्रद्युम्न सिंह तोमर :
काँग्रेसला सोडचिठ्ठी देणारे ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थकांमधील पहिले नाव आहे प्रद्युम्नसिंह तोमर. तोमर हे मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारमध्ये अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री म्हणून काम पाहिले आहे. प्रद्युम्नसिंह तोमर हे ग्वाल्हेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. प्रद्युम्न सिंह तोमर हे नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असतात. ते ज्योतिरादित्य शिंदे यांचे खंदे समर्थक आहेत. स्वत: गटारात उतरून साफसफाई केल्यानंतर तर ते चर्चेतच राहिले होते.

१६) ओ. पी. एस. भदौरिया :
ओ. पी. एस. हे मेहगाव येथील आमदार आहेत. ज्योतिरादित्य यांच्या कट्टर समर्थकांपैकी ते एक आहेत.

१७) मुन्नालाल गोयल :
मुन्नालाल गोयल हे ग्वाल्हेर विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत.