खासदार संभाजीराजे लवकरच देणार भाजपला सोडचिठ्ठी? नवा पक्ष स्थापन करणार?, सोशल मीडियावर कॅम्पेन सुरु

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje ) नवा पक्ष स्थापन करणार असल्याची आता चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे संभाजीराजे खासदार पदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या संभाजीराजे हे वर्षा निवासस्थानी पोहचले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्यामध्ये चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान दुपारी पाच वाजता संभाजीराजे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संभाजीराजे यांच्यात वर्षा या शासकीय निवासस्थानी चर्चा सुरु झाली आहे. या बैठकीला अशोक चव्हाण यांच्यासह राज्याचे महाधिवक्ते आशुतोष कुंभकोनी उपस्थित आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटण्यापूर्वी खासदार संभाजीराजे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या मुद्यावरुन भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आता अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्यव्यपी दौरा करुन मराठा समाजाच्या भावना समजावून घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या आक्रमक भूमिकेला सोशल मीडियातून मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यांनी स्वत:चा पक्ष काढावा अशी मागणी सोशल मीडियातून होऊ लागली आहे.

सोशल मीडियावर कॅम्पेनही सुरु

संभाजीराजे हे नवीन पक्ष किंवा संघटना स्थापन करुन, मराठा आरक्षण लढा अधिक तीव्र करु शकतात. तसंच मराठा सोडून बहुजन समाजाला एकत्र आणून मराठा आरक्षण लढा नव्याने सुरु करण्याची शक्यता आहे. यासाठी सोशल मीडियावर कॅम्पेनही सुरु करण्यात आले आहे. उद्या ते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार आहेत.

राजकीय पक्षांशी फारकत घेऊन करोना संपल्यावर लढा अधिक तीव्र करण्याची शक्यता आहे. संभाजीराजे हे भाजपला रामराम ठोकून शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाऊन पुन्हा खासदार पद मिळवू शकतात.

READ ALSO THIS :

डोळ्याजवळील सुरकत्या दूर करण्यासाठी ‘हे’ फूड्स रामबाण उपाय, 7 दिवसांमध्ये दूर होईल समस्या

जयंत पाटलांचे स्पष्टीकरण, म्हणाले – ‘….म्हणून राज्यात अधिवेशन घेत नाही’

Covid-19 प्रतिबंधक व्हॅक्सीन घेतल्यानंतर कोरोना होण्यावरून AIIMS चे संचालक गुलेरिया यांनी सांगितली ‘ही’ बाब, म्हणाले…

 

Pune : चतुःश्रृंगी परिसरात सोनसाखळी चोरीच्या 2 घटना, चोरटे पुन्हा अ‍ॅक्टीव्ह