MP Sanjay Raut | मुश्रीफ, अजित पवार, भुजबळ हे सुद्धा महादेव ॲपचे मेंबर; जेलमध्ये …, संजय राऊतांचा बघेलांवरून हल्लाबोल

मुंबई : MP Sanjay Raut | महादेव अ‍ॅपमध्ये (Mahadev App) भूपेश बघेल अडकले आणि जर ते आता भाजपमध्ये (BJP) गेले तर त्यांचा हर हर महादेव होईल. हसन मुश्रीफ (Hasan Mushrif), अजित पवार (Ajit Pawar), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे सुद्धा महादेव अ‍ॅपचे मेंबर आहेत. जेलमध्ये पाठवायचे होते, त्यांची आता पूजा केली जातेय. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) अमित शहा (Amit Shah) त्यांच्यावर फुले टाकतात, अशी जोरदार टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केली आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले, गोंदियामध्ये तुम्ही बघितले असेल प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी मोदींचे स्वागत केले. इकबाल मिरची सोबत संबंध असल्याचा आरोप प्रफुल पटेलांवर यांनीच केला होता. आता तेच हातात हात घालून चालत होते हे सगळे महादेव अ‍ॅपची कमाल आहेत.

राऊत म्हणाले, मुख्यमंत्री काय बोलतात त्याकडे महाराष्ट्र गांभीर्याने पाहत नाही. दोन उपमुख्यमंत्री काय बोलतात त्याकडे पण महाराष्ट्र गांभीर्याने पाहत नाही. ग्रामपंचायत निवडणुकासंदर्भात घटनाबाह्य सरकार जे फटाके वाजवतेय ते फुसके आहेत. हे आकडे प्रत्येक जण आपापल्या बाजूने दाखवत आहे.

ग्रामपंचायतीमध्ये आम्ही कसे जिंकलो आणि विरोधक कसे हरले हे दाखवत आहेत हा मूर्खपणा आहे. या निवडणुका पक्ष आणि चिन्हावर लढवल्या जात नाहीत, हे जर घटनाबाह्य राज्यकर्त्यांना माहीत नसेल तर हे अनाड्यांचे सरकार आहे, अशी खोचक टीका राऊत यांनी केली. (MP Sanjay Raut)

संजय राऊत पुढे म्हणाले, या लोकांनी पंचायती राज समजून घ्यायला हवे. पण हे अनाडी घोडे उधळलेले आहेत. जे राजकीय पक्ष विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका घ्यायला घाबरतात, त्यांची हातभर फाटते, त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालावर दावा सांगावा हे हास्यास्पद आहे.

राऊत म्हणाले, जे सरकार, जे राजकीय पक्ष मुंबईसह १४ महापालिकांच्या निवडणुका लावत नाहीत ते सांगतात
आम्ही ग्रामपंचायत निवडणुका जिंकलो. घ्या तुम्ही सिनेट आणि मुंबई महापालिका सह इतर १४ महापालिकांच्या
निवडणुका व जिल्हा परिषद निवडणुका घ्या आणि मग सांगा कोण जिंकले कोण हरले?

संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रमध्ये अडाण्यांचे सरकार आहे. यात राज्याची बदनामी होत आहे.
ते काही आकडे सांगू दे त्यांना आकडा लावायची सवय आहे. ५० खोके ४० खोके ते आकड्यावरच जगतात.
निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या असताना तुम्ही रडीचा डाव खेळता. एक पक्ष आणि एकदाच निवडणूक अशी त्यांची घोषणा आहे.

मराठ आरक्षण-ओबीसी हा सगळा विषय अत्यंत नाजूक आणि गंभीर आहे. जातीपातीच्या नावावर हे राज्य फोडण्याचे
एक षडयंत्र सुरू आहे. या राज्यात राजकीय अस्थिरता राहावी यासाठी प्रयत्न केला जातो आहे.
यामुळे या ठिकाणचे रोजगार, उद्योग हे बाजूच्या राज्यामध्ये जावे यासाठी टाकलेले डाव आहेत.
आपल्या राज्यकत्र्यांनी या डावांमध्ये फसू नये. या राज्यामध्ये सामाजिक एकता राहावी यासाठी सगळ्यांनी प्रयत्न
करावे अशी शिवसेनेची भूमिका आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Statue Of Shiva Chhatrapati Kupwara | काश्मीर खोऱ्यामध्ये दुमदुमला छत्रपतींचा जयघोष ! भारत-पाक नियंत्रण रेषेजवळील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सैनिकांना प्रेरणादायी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Pune Crime News | ‘आम्ही इथले भाई’ म्हणत तरुणावर प्राणघातक हल्ला, उरुळी कांचनमधील घटना