MP Sanjay Raut | दौंडमध्ये हायव्होल्टेज ड्रामा, संजय राऊतांची भीमा पाटस कारखान्यावर धडक; पोलिसांनी अडवताच दिली हक्कभंगाची धमकी

दौंड/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) बुधवारी पुणे जिल्ह्यातील दौंड दौऱ्यावर आहेत. वरवंडला संध्याकाळी सहाच्या वाजता त्यांची नियोजित सभा होती. सभेपूर्वी त्यांनी भीमा पाटस साखर कारखान्याची (Bhima Patas Sugar Factory) पाहणी करण्यासाठी गेले. मात्र, संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना पोलिसांनी (Pune Rural Police) अडवलं. आपल्याला कारखान्यावर जाता येणार नाही. एनओसी (NOC) लागेल, अशी अट पोलिसांनी राऊतांना घातली. 15 मिनिटे राऊत आणि पोलीस यांच्या बाचाबाची सुरु होती. दौंडचे माजी आमदार रमेश थोरात (Former MLA Ramesh Thorat) यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी ऐकले नाही. अखेर राऊतांनी आक्रमक पवित्रा घेत पोलिसांना (Daund Police) हक्कभंगाचा इशारा दिला.

 

संजय राऊत (MP Sanjay Raut) म्हणाले, मी राज्यसभेचा खासदार आहे. मला महाराष्ट्रातील विधानसभेच्या आमदारांनी निवडून दिलंय. एका खासदाराला तुम्ही कारखान्यात जाण्यापासून रोखताय. कारखाना ही कुणाची सार्वजनिक मालमत्ता नाही. ही शेतकऱ्यांची मालमत्ता आहे. जर या ठिकाणी येण्यास बंदी असेल तर ही गुंडागर्दी आहे. खासदाराला रोखलं म्हणून मी थेट संसदेत तुमच्याविरोधात हक्कभंग आणेन, असा इशारा देताच पोलिसांनी दोन मिनिटात बाजूला होऊन त्यांची वाट मोकळी करुन दिली.

 

मला आडवणारे राहुल कुल (Rahul Kul) फडणवीस समितीचे प्रमुख असतील.
पण मी थेट संसदेत जाऊन पोलिसांवर हक्कभंग आणेन. एका खासदाराला तुम्ही असं अडवू शकत नाही.
कारखान्यात प्रवेश करायला एनओसी लागते हे मला पहिल्यांदाच समजलं,
असं सांगत संजय राऊत यांनी राहुल कुल यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

 

राहुल कुल विरोधात राऊतांची CBI कडे तक्रार
संजय राऊत यांनी राहुल कुल यांच्याविरोधात सीबीआयकडे (CBI) तक्रार दाखल केली आहे.
भीमा-पाटस सहकारी कारखान्यात 500 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला
असून याप्रकरणी तक्रार करुनही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) त्याकडे दुर्लक्ष करत आहेत,
त्यामुळे आपण सीबीआयकडे तक्रार केली असल्याचे संजय राऊतांनी म्हटले.

 

Web Title :- MP Sanjay Raut | Pune rural daund yavat police allowed mp sanjay raut to enter the bhima patas sugar mill factory after warning of breach of privilege

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jalyukt Shivar Yojana Maharashtra | जलयुक्त शिवारला मोठे यश, जलसंवर्धनात महाराष्ट्र पहिला

Maharashtra Political News | शरद पवार भाजपमध्ये आले तर त्यांचे स्वागतच करु, भाजपच्या मंत्र्याचं सूचक विधान

Nira Ujwa Kalwa | नीरा उजव्या कालव्याची 19 जूनपर्यंत सलग दोन आवर्तने; कालवे सल्लागार समिती बैठकीत निर्णय