MP Sanjay Raut | विधिमंडळ पक्ष कार्यालयातून उद्धव ठाकरेंचा फोटो हटवला, संजय राऊतांचा शिंदे गटावर घणाघात, म्हणाले – ‘हा शुद्रपणा…’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session 2023) सोमवार पासून सुरु झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिंदे गटाने (Shinde Group) शिवसेनेच्या (Shivsena) विधिमंडळातील पक्ष कार्यालयातू ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे फोटो हटवले. यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. हा शुद्रपणा आहे, तो हलकटपणा आहे, अशा शब्दात संजय राऊतांनी (MP Sanjay Raut) शिंदे गटावर टीका केली. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत (MP Sanjay Raut) पुढे म्हणाले, इतके घाणेरडी आणि दळभद्री मनोवृत्तीची लोक आमचे सहकारी होते, याची देखील आता आम्हाला लाज वाटू लागली आहे. त्यांनी पक्षाच्या कार्यालयातून उद्धव ठाकरेंचे फोटो काढले असले तरी जनतेच्या हृदयात ठाकरे परिवाराला जे स्थान आहे, ते कसं दूर करणार? हा शुद्रपणा आहे. हा हलकटपणा आहे.

म्हणून तुम्ही गद्दारीची क्रांती करु शकलात

तुम्ही आयुष्यभर ज्यांचे मीठ खाल्ल, ज्यांनी तुम्हाला मान-सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून दिली.
अगदी बाळासाहेब ठाकरेंपासून (Balasaheb Thackeray) ते उद्धव ठाकरे यांच्यापर्य़ंत यांनी तुम्हाला पदं दिली, म्हणून तुम्ही गद्दारीची क्रांती करु शकलात. त्यांचे फोटो काढल्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल असा इशारा संजय राऊत यांनी शिंदे गटाला दिला. तसेच इतके घाणेरडे आणि दळभद्री मनोवृत्तीचे लोक आमचे सहकारी म्हणून वावरत होते, याची आम्हाला लाज वाटू लगली आहे, असंही राऊत म्हणाले.

Web Title :- MP Sanjay Raut | sanjay raut reaction on shinde group removes photos of uddhav thackeray from vidhimandal office

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nashik ACB Trap | 40 हजारांची लाच घेताना भूमी अभिलेखचा लिपिक ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | विमानाने पुण्यात येऊन महागडे फोन चोरणारी आंतरराज्यीय टोळी विमानतळ पोलिसांकडून गजाआड, 30 लाखांचे मोबाईल जप्त

Aaditya Thackeray | सहा महिन्यात बारावे कारण दिलंय, तरीही ते गद्दारच!, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला