MP Sanjay Raut | राज्य अनाडी लोकांच्या हाती गेलेय, महापालिका निवडणुका घ्यायला यांची हातभर…, संजय राऊत यांची टीका

मुंबई : MP Sanjay Raut | राज्य अनाडी लोकांच्या हाती गेले आहे. ग्रामपंचायत निवडणुका (Gram Panchayat Elections) आम्हीच जिंकल्याचा दावा बरेच गटतट करीत आहेत. या निवडणुका पॅनल पद्धतीने लढवल्या जातात. पक्ष आणि चिन्हावर लढवल्या जात नाहीत. त्यामुळे आम्हीच जिंकलो हा दावा पोकळ आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray Group) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक ग्रामपंचायती मिळाल्याचा दावा करत मुख्यमंत्र्यांसह भाजपाच्या (BJP) काही नेत्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली होती. यावर संजय राऊत यांनी एक्सवर एक पोस्ट करून उत्तर दिले आहे.

संजय राऊत यांनी म्हटले आहे की, जे लोक विद्यापीठाच्या सेनेट निवडणुका घेण्यास घाबरतात. मुंबईसह १४ महानगर पालिकांच्या निवडणुका घ्यायला यांची हातभर फाटते. ते ग्राम पंचायत निवडणुका आम्हीच जिंकल्याचा गुलाल उधळत आहेत. याला काय म्हणावं? हास्य जत्राच!

संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी म्हटले की, या निवडणुका पॅनल पद्धतीने होतात. गावाच्या विकासासाठी या
निवडणुका होतात. अडाणी घोडे सध्या उधळले आहेत. आम्हीच जिंकलो असं म्हणत आहेत.
मात्र मुख्यमंत्री एकच टेप वाजवत आहेत. मात्र त्यामुळे जनमत त्यांच्या बाजूने होणार नाही.

संजय राऊत यांनी पुढे म्हटले आहे की, सरकारला आकडा लावायची सवय आहे. ४० खोके, ५० खोके.
त्यांनी काहीही आकडा लावला तरीही काही फरक पडत नाही. ग्रामपंचायत निवडणुका चिन्ह आणि पक्षांवर लढवल्या
जात नाहीत. हे सरकार सिनेट निवडणूक घ्यायला घाबरतं आहे. त्यांनी हा दावा करणं हास्यास्पद आहे असंही राऊत
म्हणाले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil | मनोज जरांगेंचा गंभीर आरोप, ओबीसींचे नेते आमच्याविरोधात षडयंत्र रचत आहेत, मराठा नेत्यांनी…

Modi Govenment | मोदी सरकारची दिवाळी भेट, सर्वसामान्यांसाठी स्वस्तात ‘भारत आटा’; जाणून घ्या किंमत आणि इतर गोष्टी…