MP Supriya Sule | सदानंद सुळे यांना इन्कम टॅक्सची नोटीस, ED ची नव्हे; सुप्रिया सुळे यांचा खुलासा

कऱ्हाड : पोलीसनामा ऑनलाइन – सदानंद सुळे (Sadanand Sule) यांना इन्कम टॅक्सची नोटीस (Income Tax Notice) आली आहे. ईडीची (ED) नाही. आम्ही दोषी नाही आहोत असे सांगीतले आहे. मी तक्रार केली नव्हती. मी लढणार आहे, अशी स्पष्टोक्ती खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी दिली. सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) आज सातारा जिल्ह्यातील (Satara District) कऱ्हाड (Karad) दौऱ्यावर असून त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

 

यावेळी आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde), सागर पाटील, सत्यजितसिंह पाटणकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या संगीता साळुंखे, राजेश पाटील – वाठारकर, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील, माजी नगरसेवक सौरभ पाटील, नंदकुमार बटाणे, जयंत बेडेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) पुढे म्हणाल्या, सदानंद सुळे यांना ईडीची नाही तर इन्कम टॅक्सची नोटीस आली आहे. आम्ही दोषी नाही आहोत, असं सांगितलंय. मी तक्रार केली नव्हती. मी लढणार असल्याचे सांगत त्या म्हणाल्या. अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्या वक्तव्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP State President Jayant Patil) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. राज्यात, देशात महागाईचं मोठं आव्हान आहे. केंद्र सरकारकडं (Central Government) मी सातत्याने खासदार म्हणून तो प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. आम्ही केलेल्या सूचनांची अंमलबजावणी केली तर महागाईतून काहीसा दिलासा मिळण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.

 

गुणरत्न सदावर्तेंच्या (Gunaratna Sadavarte) प्रश्नावर त्यांनी प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव असतो आणि त्याचे संस्कार असतात.
माझे भाग्य आहे की भारताचा सुपूत्र ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांचे माझ्यावर संस्कार आहेत.
त्यामुळे असल्या गोष्टीवर बोलणे मला योग्य वाटत नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी (Dr. Babasaheb Ambedkar) घटनेतुन (Constitution) प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार दिला आहे.
त्यामुळे त्यांच्यावर झालेल्या संस्कारानुसार ते बोलत असतील.

 

Web Title :- MP Supriya Sule | sadanand sule has received income tax notice not ed supriya sule in karad of satara district

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा