Ajit Pawar on Amol Mitkari Statement | अमोल मिटकरींच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर अजित पवार संतापले; म्हणाले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar on Amol Mitkari Statement | राज्यात आधीच अनेक विषयांवरून राजकारण तापलेलं असताना त्यात आणखी एक भर पडली आहे. राष्ट्रवादीचे (NCP) विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी सांगलीमधील (Sangli) राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहेत. अशातच यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

 

माझं नेहमी स्पष्ट मत असतं आणि तुम्हा सर्व मीडियाला माहिती आहे. तुम्ही नेहमी मला असले प्रश्न विचारत असता की याने असं वक्तव्य केलं त्याबद्दल तुमचं मत काय आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तींनी मत व्यक्त करत असताना कुठल्या समाजाबद्दल, घटकाबद्दल अवमान होणार नाही तसंच नाराजी वाढणार नाही याचं तारतम्य ठेवूनच वक्तव्यं केली पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.

 

अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे गुरूवारी पुण्यातील (Pune) वातावरण तापलेलं पाहायला मिळालं.
ब्राह्मण महासंघाने (Akhil Bharthiya Brahman Mahasangh) आंदोलन केलं होतं.
ब्राह्मण महासंघानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर (Nationalist Congress Office Pune) आंदोलन केलं.
मिटकरींनी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

 

दरम्यान, मिटकरींच्या या वक्तव्यामुळे इतकं महाभारत घडलं असलं तरी मिटकरी हे आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत.
मी कुठेही ब्राह्मण समाजाचं नाव घेतलं नसल्याचं मिटकरी म्हणाले.

 

 

Web Title :- Ajit Pawar on Amol Mitkari Statement | ajit pawar on controversy over ncp mla amol mitkari statement over brahmin

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा