MPSC Exam | 3 परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक जारी; जाणून घ्या तारखा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – MPSC Exam | कोरोना महामारीच्या (Corona Virus) पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (Maharashtra Public Service Commission) एमपीएससी परीक्षा (MPSC Exam) पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र आता एमपीएससीमार्फत सुधारीत वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जानेवारी महिन्यात घेतल्या जाणाऱ्या 3 परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक (Revised Schedule) जारी करण्यात आलं आहे. यानूसार एमपीएससीमार्फत जानेवारी (2022) मध्ये नियोजित 3 परीक्षांच्या सुधारित दिनांकाबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलं गेलं आहे.

 

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC Exam) 2 जानेवारी 2022 रोजी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 चे आयोजन केलं होतं. मात्र ते पुढे ढकलण्यात आलं होतं. आता तीच परीक्षा 23 जानेवारी रोजी होणार आहे. तसेच महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा -2020 संयुक्त (पेपर क्रमांक-) 22 जानेवारी रोजी होणार होती. ती परीक्षा आता 29 जानेवारीला होणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षा 2020, (पेपर क्रमांक-2) 29 जानेवारी रोजी होणार होती. ती परीक्षा आता 30 जानेवारीला होणार आहे.

 

दरम्यान, एमपीएससीने (MPSC) जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे की, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोजनाच्या अनुषंगाने आयोगाकडून आढावा घेण्यात येईल. तर, याबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर जारी करण्यात येणार आहे. याकरीता आयोगाच्या संकेतस्थळाचे नियमित अवलोकन करणे उमेदवारांच्या हिताचे राहील. असं सांगितलं आहे.

 

Web Title :- MPSC | mpsc recruitment 2022 revised exam time table

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा