MPSC Recruitments | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये 900 पदांवर मेगा भरती, 11 जानेवारीपर्यंत करू शकता अर्ज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – MPSC Recruitments | नोकरीचा शोध घेत असलेल्या तरूणांसाठी चांगली बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) विविध पदांवर बम्पर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यासाठी एक अधिसूचना (Notification) जारी केली आहे. अधिसूचनेनुसार आयोगाद्वारे उद्योग निरीक्षक, क्लर्क-टायपिस्ट (मराठी), क्लर्क-टायपिस्ट (इंग्रजी) इत्यादी विविध ग्रुप सी पदांवर भरती केली जाईल. (MPSC Recruitments)

 

पदांसाठी इच्छूक उमेदवार आपला अर्ज 11 जानेवारी 2022 पर्यंत अधिकृत वेबसाइट (Official Website) mpsconline.gov.in वर जमा करू शकतात. योग्य उमेदवारांना प्राथमिक परीक्षेसाठी बोलावले जाईल जी 03 एप्रिल 2022 ला आयोजित होईल.

 

अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र लोकसेवा आयोग एकुण 900 पदांवर भरती करेल. ज्यामध्ये 103 उद्योग निरीक्षक, 114 डेप्युटी इन्स्पेक्टर, 14 तांत्रिक सहायक, 117 टॅक्स असिस्टंट, 473 क्लर्क-टायपिस्ट (मराठी), 79 क्लर्क-टायपिस्ट (इंग्रजी) चा समावेश आहे.

 

उमेदवारांकडे इंजिनियरिंग आणि इतर प्रासंगिक डिप्लोमा किंवा डिग्री असावी. उमेदवारांची निवड एमपीएससी ग्रुप सी प्राथमिक परीक्षा आणि त्यानंतर एमपीएससी ग्रुप सी मेन्स परीक्षेच्या आधारावर होईल. (MPSC Recruitments)

MPSC Group C : महत्वाच्या तारखा

– ऑनलाइन अर्ज जमा करण्याची प्राथमिक तारीख – 22 डिसेंबर 2021.

ऑनलाइन अर्ज जमा करणयाची शेवटची तारीख – 11 जानेवारी 2022.

प्राथमिक परीक्षा तिथी – 03 एप्रिल 2022.

मुख्य परीक्षेची तारीख (संयुक्त पेपर I) – 06 ऑगस्ट 2022.

क्लर्कसाठी मुख्य परीक्षा- टायपिस्ट पेपर II : 13 ऑगस्ट 2022.

उप निरीक्षक पेपर II साठी मुख्य परीक्षा तारीख – 20 ऑगस्ट 2022.

टॅक्स असिस्टंट पेपर II साठी मुख्य परीक्षा तारीख – 27 ऑगस्ट 2022.

तंत्रज्ञान सहायक पेपर II साठी मुख्य परीक्षा तारीख – 10 ऑगस्ट 2022.

उद्योग निरीक्षक पेपर II साठी मुख्य परीक्षा तारीख – 17 ऑगस्ट 2022.

 

वयोमर्यादा

उद्योग निरीक्षक – 19 ते 38 वर्ष.

डेप्युटी इन्स्पेक्टर – 18 ते 38 वर्ष.

तांत्रिक सहायक – 18 ते 38 वर्ष.

टॅक्स असिस्टंट – 18 ते 38 वर्ष.

क्लर्क-टायपिस्ट (मराठी) – 19 ते 38 वर्ष.

क्लर्क-टायपिस्ट (इंग्रजी) – 19 ते 38 वर्ष.

 

Web Title :- MPSC Recruitments | maharashtra public service commission MPSC has released bumper recruitments can apply till january 11

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | ‘चाकण’च्या हद्दीत भर चौकात कुस्ती तालीम चालवणारे पैलवान नागेश कराळे यांची गोळ्या झाडून हत्या; पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये प्रचंड खळबळ

Omicron Restrictions Maharashtra | राज्यात पुन्हा निर्बंध ! ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेऊन आज नवीन नियमावली जाहीर होणार

RBI | डेबिट आणि क्रेडिट कार्ड संदर्भातील महत्त्वाची बातमी ! आरबीआयने ‘तो’ निर्णय 6 महिने पुढे ढकलला; 1 जानेवारीपासून होणार होता लागू