MPSC Students Protest in Pune | आवश्यकता पडल्यास कोर्टात जाऊ, देवेंद्र फडणवीसांचे MPSC विद्यार्थ्यांना आश्वासन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – MPSC Students Protest in Pune | वर्णनात्मक परीक्षा पद्धत 2025 पासून लागू करावी यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला आहे. परंतु अद्याप महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Public Service Commission) निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सोमवारपासून एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी रस्त्यावर उतरले (MPSC Students Protest in Pune) आहेत. विद्यार्थ्यांनी बालगंधर्व रंग मंदिराबाहेर (Balgandharva Rangmandir) रस्त्याच्याकडेला ठिय्या मांडला आहे.

दरम्यान, भाजप नेते अभिमन्यू पवार (BJP Leader Abhimanyu Pawar) यांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी फोनवरून संवाद करुन दिला. विद्यार्थ्यांसोबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी आणि मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) आयोगासोबत याबाबात चर्चा केली. हे शक्य नाही, हे 2025 पासूनच लागू केलं पाहिजे असे आयोगाला सांगितले आहे. तसेच पुन्हा आयोगाची बैठक घेऊन याबाबत निर्णय करा अन्यथा याविरोधात आम्हाला कायदेशीर बाजू घेऊन कोर्टात जावे लागेल असे देखील आयोगाला मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे फडणवीस यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना (MPSC Students Protest in Pune) सांगितले.

आयोगाला कुठल्याही पद्धतीने विद्यार्थ्यांचे म्हणणे पटवून देता येईल. जोपर्यंत याबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत आयोगाकडे नवीन पदांची जागा पाठवणार नसल्याचे फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना आश्वासन दिले. पहिल्यांदा याबाबत निर्णय करावा असा प्रयत्न सुरु असल्याचे ही फडणवीस यांनी सांगितले.

आवश्यकता पडल्यास कोर्टात जाऊ

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सरकार आपल्या बाजूने आहे. आम्ही यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहोत.
गरज पडल्यास आम्ही कोर्टात जाऊ. पण हा निर्णय करुन घेतला जाईल, असे आश्वसन फडणवीस यांनी दिले.
नोटिफिकेशन (Notification) आल्याशिवाय आम्ही आंदोलन बंद करणार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली
आहे. यावर फडणवीस म्हणाले, विद्यार्थ्यांच्या भावना योग्य आहेत, मात्र आयोग स्वायत्त आहे.
शासनाच्या हातात असतं तर आजच नोटीफिकेशन जारी केलं असत. मात्र आता पाठपुरावा करावा लागत आहे.
जर आयोगाने निर्णय कायम ठेवला तर सरकारला त्याविरोधात न्यायालयात जावं लागेल.
त्यामुळे याला वेळ लागू शकतो असेही फडणवीस यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना सांगितलं.

Web Title :- MPSC Students Protest in Pune | devendra fadnvis on mpsc students protest in pune assures students mpsc exam format syllabus

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aurangabad Crime News | परीक्षेच्या तणावातून तरुणाने उचलले ‘हे’ पाऊल; औरंगाबाद हादरलं

Sonu Nigam | चेंबूर येथील कार्यक्रमादरम्यान झालेल्या धक्काबुक्कीवर सोनू निगमने दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले…

Pune Crime News | प्रवासी तरुणीशी लगट करण्याचा प्रयत्न आला अंगाशी; पीएमपीच्या बस कंडक्टरला अटक