Mrunal Thakur | गुलाबी रंगाच्या साडीमध्ये मृणाल ठाकूर दिसतीय एकदम सुंदर आणि सोज्वळ

पोलीसनामा ऑनलाइन : मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. मृणाल दररोज नवनवीन लूकमधील तिचे फोटोज चाहत्यांसाठी शेअर करत असते. तिचे फोटो सर्वांचेच लक्ष वेधून घेत असतात. आता मृणालने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती ट्रॅडिशनल लूकमध्ये दिसत आहे. याआधी मृणालने काही तिचे हॉट फोटोज देखील शेअर केले होते, त्याच्या तुलनेत तिच्या या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत असल्याचे कमेंट चाहते करत आहेत.

मृणालने (Mrunal Thakur) शेअर केलेल्या तिच्या ट्रेडिशनल लूक मधील फोटोजला नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली आहे. मृणालने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने गुलाबी रंगाची साडी गोल्डन कानातले, गळ्यात गोल्डन कलरचे चोकर, हातात रिंग आणि केस मोकळे सोडत तिचा लुक पूर्ण केला आहे. यावेळी मृणालने हेवी ज्वेलरी कॅरी केली आहे. चमकदार मेकअप करत मृणाल ने एकापेक्षा एक लूक देत सर्वांचे लक्ष वेधले आहे. मृणालने हे फोटो शेअर करत कॅप्शन मध्ये म्हटले की, “साडी लव्ह”. या फोटोमध्ये मृणाल खूपच सुंदर आणि सोज्वळ दिसत आहे. तर अनेकांनी मृणालच्या या फोटोवर कमेंट करत तिचे कौतुकही केले आहे.

मृणालच्या या फोटोवर सध्या कौतुकांचा वर्षाव होताना दिसत आहे. 2022 मध्ये ‘जर्सी’, ‘सितारामन’ या
चित्रपटातून मृणाल प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तर आता मृणालच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षकांना आतुरता आहे.
मृणालने आजवर तिच्या वेगवेगळ्या लूक मधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सोशल मीडियावर मृणालचे 7 मिलियन पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.
मृणालने आजवर तिच्या अभिनयाने प्रत्येकाच्या मनात स्वतःची जागा निर्माण केली आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर देखील ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते.

Web Title :- Mrunal Thakur | bollywood actress mrunal thakur saree photos saree love

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CP Retesh Kumaarr | औद्योगिक कंपन्या व व्यापाऱ्यांना त्रास देणाऱ्या बेकायदेशीर संघटनांवर कडक कारवाई करणार, न घाबरता तक्रार करावी; पोलीस आयुक्त रितेश कुमार यांचे आवाहन

Anil Bonde | ‘जयंत पाटलांना शरद पवार हे शकूनी मामा पेक्षाही ‘पॉवरफूल’ आहेत, असे तर म्हणायचे नाही ना’, अनिल बोंडेंचा घणाघात