Mrunal Thakur | मृणाल ठाकूर विजय देवरकोंडासोबत स्क्रीन शेअर करण्यास उत्सुक; म्हणाली, “आम्ही एकमेकांकडून खूप काही…

पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) ही यशाच्या शिखरावर असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. मराठमोळ्या मृणालने मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली, ती आता एकामागून एक हिट चित्रपट देत आहे. मृणालचा मोठा चाहता वर्ग असून ते चाहते तिच्या आगामी चित्रपटांच्या प्रतिक्षेत असतात. लवकरच मृणाल ठाकूरचे (Mrunal Thakur) दोन नवे दाक्षिणात्य चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. मृणालचा ‘हाय नन्‍ना’ (Hi Nanna) व ‘वीडी13’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस (Mrunal Thakur Upcoming Movies) येणार आहेत. ‘वीडी13’ (VD 13 Movies) या चित्रपटामध्ये मृणाल अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) सोबत स्क्रीन शेअर करणार आहे तिने नुकतेच विजय सोबत काम करण्यास ती उत्सुक असल्याचे सांगितले असून मृणालने विजयचे कौतुक केले आहे.

अभिनेत्री मृणाल ठाकूर हिने दाक्षिणात्य सिनेविश्वामध्ये अभिनयाच्या बळावर स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ती आता ‘वीडी13’ या चित्रपटाच्या कामाला लागली असून एका मुलाखतीमध्ये तिने सहकलाकराविषयीचे आपले मत मांडले आहे. मृणालने सांगितले की विजय देवरकोंडा हा त्यांची प्रत्येक भूमिका अजरामर (Vijay Deverakonda Movies) करतो व त्यांच्यासोबत काम करण्यास मज्जा येणार असल्याने मृणालने सांगितले. या आधी तिने साउथच्या नानी (Nani) आणि दुलकर सलमान (Dulquer Salmaan) या कलाकारांसोबत काम केले आहे. अशा वैविध्यपूर्ण कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळणे ही सुवर्णसंधी असल्याचे मृणालने सांगितले.

ती पुढे म्हणाली की, जेव्हा मी सीता रामम (Sita Ramam) या चित्रपटात काम करायला सुरुवात केली, तेव्हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकांनी माझे प्रेमाने स्वागत केले.या इंडस्ट्रीमध्ये उत्तम कलाकार आहेत. त्याच्यांसोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मला मिळत आहे याबद्दल मी आभारी आहे. सेटवर कधीही माझा दिवस कंटाळवाणा जात नाही. दुलकर, नानी आणि विजय हे वेगवेगळ्या प्रकारचे कलाकार आहेत. सीता राममसाठी मला जे प्रेम प्रेक्षकांकडून मिळालं, तेच प्रेम माझ्या आगामी ‘हाय नन्‍ना’ आणि ‘वीडी13’ या चित्रपटांनाही मिळेल अशी अपेक्षा आहे.

Mrunal Thakur

https://www.instagram.com/p/CrnE4DINmy9/?igshid=MzRlODBiNWFlZA==
https://www.instagram.com/p/CuOThewrZe4/?igshid=MzRlODBiNWFlZA==

अभिनेता विजय देवरकोंडा बद्दल अभिनेत्री मृणाल ठाकूरने (Vijay Deverakonda and Mrunal Thakur) तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ती म्हणाली की, मी विजयसोबत सेटवर काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे कारण, मला माहित आहे की आम्ही कलाकार म्हणून एकमेकांकडून खूप काही शिकणार आहोत. आत्ता आम्ही चित्रपटासाठी तयारी सुरू केली असून लवकरच शूटिंगला देखील सुरुवात होणार आहे. मी विजयसोबत स्क्रीन स्पेस शेअर करण्यासाठी खूपच उत्सुक आहे.

पुढे मृणालने (Mrunal Thakur) विजयचे कौतुक केले. ती म्हणाली की, “त्याने पडद्यावर कोणत्याही भूमिका केल्या
तरी कॅमेऱ्यासमोर त्याची क्षमता अप्रतिम आहे. प्रत्येक चित्रपटात त्यांने अशी अविस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत
ज्या आमच्या नेहमीच लक्षात राहणार आहेत. त्याने साकारलेला अर्जुन रेड्डीमधील (Arjun Reddy) डॉ. अर्जुन रेड्डी देशमुख
असो किंवा महानतीमधील (Mahanati Movies) विजय अँथनी प्रत्येक भूमिकेस विजय न्याय देतो.
‘वीडी13’ ची टीम देखील लवकरच शूटिंग सुरू करणार आहे.

ACB Trap News | 30 हजार रुपये लाच घेताना वैधमापन शास्त्र विभागाचा निरीक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Maharashtra Monsoon Session | ‘आईच्या पोटी कोणी…’, विधानसभेत आदित्य ठाकरे-गुलाबराव पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी, अध्यक्षांना करावा लागला हस्तक्षेप