महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास १० हजारांची लाच घेताना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन
‘थ्री फेज कनेक्शन’ची जोडणी करण्यासाठी ३५ हजारांची लाचेची मागणी करुन १० हजारांचा पहिला हप्ता खासगी इसमामार्फत घेताना महावितरण्याच्या सहाय्यक अभियंत्यास रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारावाई लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलिसांनी भोसरी येथील महावितरणच्या कार्यालयात गुरुवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास करण्यात आली.

रोहित अशोक डामसे (वय:31,सहायक अभियंता, नेमणूक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, भोसरी शाखा, पुणे), खासगी इसम आशिष जगन्नाथ देसाई (वय:33.रा. देवकर पॅलेस, भोसरी पुणे) या प्रकरणी ४९ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे.

तक्रारदार हे महावितरणचे माजी कर्मचारी आहेत. त्यांनी ‘एक्स सर्विसमेन कॉर्पोरेशन लिमिटेड’मध्ये व्यवसायासाठी गाळा घेतला आहे. सदर गाळ्यासाठी ‘थ्री फेज कनेक्शन’मध्ये नवीन विद्युत जोडणीसाठी अर्ज केला होता. सदरचे कनेक्शन मंजूर करून देण्यासाठी खासगी इसम देसाई याने लोकसेवक डामसेसाठी 35,000/- लाचेची मागणी करून लोकसेवक डामसे व स्वतःसाठी पहिला हफ्ता 10,000/- रुपये लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक अर्चना बोदडे, पोलीस निरीक्षक जालिंदर तांदळे यांच्या पथकाने केली