MSRTC ST Bus | अजित पवारांच्या मागणीची सरकारने घेतली दखल; ‘त्या’ प्रकरणातील कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MSRTC ST Bus | विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जाहिरातबाजीच्या मुद्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली होती. अजित पवारांच्या (Ajit Pawar) भूमिकेनंतर सरकारने थेट संबंधित भूम एसटी बस आगारातील (MSRTC ST Bus) कर्मचाऱ्यांवर निलंबनाची (Suspension) कारवाई केली. मात्र कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी आमची मागणीच नव्हती, तर सरकारने जाहिरातींवरील (Advertisements) उधळपट्टी थांबवावी, असं आमचं म्हणणं असल्याचं सांगत अजित पवारांनी सरकारने घेतलेला निलंबनचा निर्णय मागे घेऊन कर्चमाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याची मागणी केली होती. राज्य सरकारने अजित पवारांची ही मागणी मान्य केली आहे.

बसची दुरवस्था (MSRTC ST Bus) आणि त्यावरील राज्य सरकारची जाहिरात व्हायरल झाल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन अखेर मागे घेण्यात आले आहे. भूम एसटी आगाराचे (Bhoom ST Depot ) वाहन परीक्षक डी.बी. एडके, एस.एन. हराळ, ए.यु. शेख यांना निलंबित केलं होतं. त्यांचे निलंबन मागे घेत त्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश भूम डेपो मॅनेजरनी दिले आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची जाहिरात असलेली खराब बस रस्त्यावर वाहतुकीसाठी सोडल्याचे कारण देत या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली होती.

काय आहे प्रकरण?

एसटी महामंडळाची दुरवस्था झालेल्या बसवर राज्य सरकारची जाहिरात असलेला एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोची दखल घेत विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकार टीका केली होती. मात्र जुनाट बसवर लावण्यात आलेल्या जाहिरातीसाठी एसटी कर्मचाऱ्यांना दोषी ठरवण्यात आलं आणि भूममधील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होतं.

एसटी कर्मचाऱ्यांच्या निलंबनावर बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले होते, मी मोडक्या,
तुटक्या एसटी बसवर राज्य सरकारने (State Government) केलेल्या जाहिरातीचा मुद्दा मांडला होता.
त्या जाहिरातीचा फोटो मी सभागृहात दाखवला होता. माझ्या सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की,
सरकारने जाहिरातीवर होणारा खर्च टाळून एसटी बसेसची सुधारणा करावी आणि एसटी कर्मचऱ्यांसाठी
हा निधी खर्च करावा, असे म्हटले होते.

मात्र असं न घडता सरकारने दोष लपवण्यासाठी खिडक्या नसलेल्या बस आगाराबाहेर काढल्याचा ठपका ठेवून
भूम एसटी आगाराचे वाहन परीक्षक डी.बी. एडके, एस.एन. हराळ, ए.यु. शेख यांना निलंबित केलं.
परंतु मी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, असं म्हटलेलं नाही.
तर खराब झालेल्या एसटी बस स्क्रॅपमध्ये काढून चांगल्या बसेस आणाव्यात, अशी मागणी होती.
त्यामुळे सरकारने एसटी कर्मचाऱ्यांवर केलेली कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली होती.

Web Title :- MSRTC ST Bus | msrtc st bus advertisement suspension of three employees of dharashiv bhoom canceled in connection with order issued to join work

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ramdas Kadam On Uddhav Thackeray | ‘…अन्यथा तुम्हाला माझ्या घरी भांडी घासायला यावं लागेल’, रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Deepak Kesarkar | ‘आम्ही सांगत होतो तुम्हीच मुख्यमंत्री राहा, परंतु…’, दीपक केसरकारांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

MLA Sanjay Shirsat | ‘छत्रपती संभाजीनगर मधून औरंगजेबाची कबर हटवा’, आमदार संजय शिरसाट यांची मागणी