Ramdas Kadam On Uddhav Thackeray | ‘…अन्यथा तुम्हाला माझ्या घरी भांडी घासायला यावं लागेल’, रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

खेड : पोलीसनामा ऑनलाइन – Ramdas Kadam On Uddhav Thackeray | शिवसेना पक्षाचे नाव (Shiv Sena Party Name) आणि धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची रत्नागिरीतील खेड येथे काल जाहीर सभा झाली. खेड येथील गोळीबार मैदानावर झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजप (BJP), शिंदे गट (Shinde Group), रामदास कदम (Ramdas Kadam), योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंच्या टीकेला रामदास कदम यांनी आज प्रत्युत्तर दिले. उद्धव साहेब तुम्ही एकदा नाही तर शंभर वेळा खेडमध्ये आला तरी योगेश कदमला पाडू शकणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. खेड हा रामदास कदमांचा बालेकिल्ला आहे. (Ramdas Kadam On Uddhav Thackeray)

रामदास कदम म्हणाले, उद्धवसाहेब तुम्ही एकदा नाही तर शंभर वेळा खेडमध्ये आलात तरी योगेश कदमला पाडू शकणार नाही. तुमच्या भोळ्या चेहऱ्यामागे अनेक चेहरे आहेत, ते चेहरे मी ओळखतो. याचा मी साक्षीदार आहे. मी केशवराव भोसलेंचा (Keshavrao Bhosle) ड्रायव्हर होतो हे तुम्ही सिद्ध केलं तर मी तुमच्या घरी भांडी घासेल, अन्यथा तुम्हाला माझ्या घरी भांडी घासायला यावं लागेल,असे आव्हान कदम यांनी उद्धव ठाकरेंना दिलं.

मी वाघासारखा जगतोय, कोणाचा ड्रायव्हर म्हणून कधी नोकरी केलेली नाही. केशवराव भोसले यांच्या निवडणुकीच्या वेळी माझी गाडी, माझा पैसा, माझं डिझेल, काय संबंध कोणाचा ड्रायव्हर म्हणून काम करण्याचा? काल तुम्ही भाषणाची सुरुवातच तशी केली, असे म्हणत कदमांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

माझा मुलगा योगेश कदमला तुम्ही संपवण्याचा प्रचंड प्रयत्न केला.
योगेश यांना संपवण्यासाठी काय कारस्थान झालं ते 19 तारखेला उदय सामंत (Uday Samant) सांगणार आहेत.
मला तर तुम्ही संपवणारच होताच. मीडियासमोर जाण्याची बंदी घातली होती.
2009 च्या निवडणुकीत मला पाडा असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते, असा दावा रामदास कदम यांनी केला.

उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करताना तुमचे हात बरबटलेले आहेत. तुम्ही भ्रष्टाचारी आहात.
तुम्ही अशोक पाटील (Ashok Patil) यांचे तिकीट कापण्यासाठी किती पैसे घेतले?
मुख्यमंत्री होण्यासाठी तुम्ही गद्दारी केली. तुम्ही गद्दार आहात, असे रामदास कदम म्हणाले.

Web Title :- Ramdas Kadam On Uddhav Thackeray  | ramdas kadam press conference even if you come to the khed 100 times you will not be able to defeat yogesh chanllenges ramdas kadam to uddhav thackeray

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीच्या नाकाचे हाड केले फ्रॅक्चर; कोंढव्यातील घटना

V V Karmarkar Passes Away | मराठी क्रीडा पत्रकारितेचे जनक वि. वि. करमरकर यांचे निधन

Pune Crime News | आईनेच चिमुरडीचा गळा दाबून केला खून; खडकीतील ३ वर्षाच्या मुलीच्या खूनाचा गुन्हा उघडकीस