Deepak Kesarkar | ‘आम्ही सांगत होतो तुम्हीच मुख्यमंत्री राहा, परंतु…’, दीपक केसरकारांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Thackeray group Chief Uddhav Thackeray) यांची काल खेड येथे जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी भाजप (BJP)-शिंदे गट (Shinde Group), निवडणूक आयोगावर (Election Commission) जोरदार हल्लाबोल केला. निवडणूक आयोगाचा निर्णय आम्हाला मान्य नसल्याचे सांगत निवडणूक आयोग हा चुना लावणारा आयोग असल्याची टीका केली. ठाकरे यांच्या सभेनंतर भाजप-शिंदे गटाकडून प्रतिक्रिया येत आहेत. याच दरम्यान शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयाचाही (Supreme Court) निर्णय मान्य नसतो असा टोला दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी लगावला. ते अहमदनगर येथे माध्यमांशी बोलत होते.

निवडणूक आयोगाचा निर्णय आम्हाला मान्य नाही, या उद्धव ठाकरेंच्या विधानाबाबत दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांना विचारले असता ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयही मान्य नसतो. त्यांना काहीच मान्य नसतं. प्रत्येकाला बरखास्त करण्याची सवय त्यांना झाली आहे. सर्वोच्च न्यायालयात वेळ कसा काढायचा, हे सगळं त्यांनी केलं. आम्ही काही केलं नाही. आम्ही नेहमी त्यांचा आदर ठेवला आहे. आज जेवढे मोठे निर्णय झाले तेवढे त्यांच्या काळात का झाले नाहीत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

दीपक केसरकर पुढे म्हणाले, शेवटी जनतेला न्याय हा द्यावाच लागतो, तो तुम्ही देऊ शकला नाहीत.
म्हणून तुमचं मुख्यमंत्रीपद गेलं. आम्ही तुमचं पद काढून घेतलेलं नाही, आम्ही तुम्हाला सांगत होतो,
तुम्हीच मुख्यमंत्री पदावर राहा, परंतु मूळ विचारधारेबरोबर रहा, एवढीच आमची आपेक्षा होती.
लोकांनी ज्या कारणासाठी निवडून दिलंय, त्यासाठी राहा.
मात्र तुम्ही आमचं ऐकलं नाही म्हणून तुमचं मुख्यमंत्रीपद गेलं. दुसरं कशामुळेच गेलं नाही.

Web Title :- Deepak Kesarkar | deepak kesarkar statement on uddhav thackeray chief minister post

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ramdas Kadam On Uddhav Thackeray | ‘…अन्यथा तुम्हाला माझ्या घरी भांडी घासायला यावं लागेल’, रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

NCP Chief Sharad Pawar | कसब्यात रवींद्र धंगेकर विजयी होतील याची मला खात्री नव्हती – शरद पवार (व्हिडिओ)

MLA Sanjay Shirsat | ‘छत्रपती संभाजीनगर मधून औरंगजेबाची कबर हटवा’, आमदार संजय शिरसाट यांची मागणी