‘धडक’ बद्दल बरेच काही…

बई : पोलीसनामा ऑनलाईन 

श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांचा अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला ‘धडक’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. शशांक खैतान दिग्दर्शित आणि करण जोहर निर्मित हा चित्रपट आहे.

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या सुपरडुपर हिट मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक असेलला धडक हा चित्रपट आहे. साहजिकच चित्रपट कसा आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांत आहे. त्यातच  चित्रपट सृष्टी गाजवलेल्या श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी ची मुख्य भूमिका आहे. त्यामुळे श्रीदेवीच्या चाहत्यांसाठी सुखद धक्का असणार आहे. श्रीदेवीची प्रतिकृती ते जान्हवी मध्ये पाहत आहेत. त्यामुळेच ‘धडक’ बद्दल जाणून घेऊयात.

[amazon_link asins=’B01N6MMTNC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1359adab-8bd1-11e8-9b56-a9fcfcb2ad0b’]

‘धडक’ हा चित्रपट एक प्रकारे  ‘सैराट’चं आहे, असे म्हटले तरी चूक असू शकणार नाही. २०१६  मध्ये  प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या सैराट ने साऱ्या महाराष्ट्रावर राज्य केले आणि अनेक सिनेमा जगतातले पुरस्कार आपल्या खिश्यात घातले होते. अजून काही असेल तर  ‘धडक’चा आत्मा ‘सैराट’आहे. पण धडक चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरतो. चित्रपटाची कथा प्रेक्षकांना आपल्यासोबत वाहावत नेते. अभिनयाबद्दल सांगायचे तर जान्हवी कपूरचा अतिशय सुंदर हा डेब्यू सिनेमा आहे. पण तिचा अभिनय पाहून हा तिचा डेब्यू सिनेमा असावा, यावर विश्वास बसत नाही. तिने यात शानदार काम केले आहे. अख्ख्या चित्रपटात ती कमालीची सुंदर दिसतेय. २२ वर्षीय इशान  माजिद माजिदी यांच्या ‘बियाँड द क्लाऊड्स’मध्ये झळकला होता. तर ‘उडता पंजाब’मध्येही त्याने लहानशी भूमिका साकारली होती. ईशान खट्टरचा हा दुसरा चित्रपट आहे. त्यानेही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल असा अभिनय केला आहे. या दोन मध्यवर्ती भूमिकांशिवाय आशुतोष राणा याची भूमिकाही तितकीच दमदार आहे. ‘धडक’ चित्रपटात राजस्थानी संस्कृती दाखवण्यात आली आहे. चित्रपटाची कथा संथपणे पुढे सरकते. चित्रपटाची सगळीच गाणी चांगली आहे. पण अनेकठिकाणी ही गाणी कथेच्या प्रवाहात अडथळा निर्माण करतात. खरे तर या लव्हस्टोरीत फार काही नवे नाही. पण तरिही सरतेशेवटी ही कथा आपल्यावर छाप सोडते. चित्रपटातील संवादही चांगले आहेत.ज्या प्रेक्षकांनी ‘सैराट’ पाहिलाय ते सगळेच या चित्रपटाशी ‘धडक’ची तुलना करणारचं. पण ज्यांनी ‘सैराट’ बघितलेला नाही, त्यांना मात्र हा चित्रपट आवडल्याशिवाय राहणार नाही. ‘धडक’चा क्लायमॅक्स अचंबित करणारा आहे. साहजिकच हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करेल यात शंका नाही.

पात्र : जान्हवी कपूर, ईशान खट्टर, आशुतोष राणा   निर्माता : करण जोहर, हिरू जोहर, अपूर्वा मेहता   दिग्दर्शित : शशांक खेतान  कालावधी: २ तास ३० मिनिटे  शैली: प्रणयरम्य

[amazon_link asins=’B01KSXQNLS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1c6cd456-8bd1-11e8-b543-d565c9dac792′]