‘शहनाज-पारस’चा शो ‘मुझसे शादी करोगे’मध्ये ‘पोल’ डान्स ! मेकर्सवर ‘अश्लील’ता पसरवण्याचा आरोप (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कलर्सवरील शो मुझसे शादी करोगे मध्ये पारस आणि शहनाजला इम्प्रेस करण्यासाठी स्पर्धक तगडी अग्निपरीक्षा देताना दिसत आहेत. सर्वजण त्यांच्या मनात जागा बनवताना दिसत आहेत. आगामी एपिसोडमध्ये एक स्पर्धक मेजेदार टास्कर करताना दिसणार आहेत.

रिअ‍ॅलिटी शो मुझसे शादी करोगेचा नवीन प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. यात स्पर्धक पारस शहनाजला इम्प्रेस करताना दिसणार आहेत. स्पर्धकांनी त्या दोघांचं मन जिंकण्यासाठी खुलून डान्स केला आहे. काही मुलींनी तर आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवत शानदार पोल डान्स केला. मुलंही गुलाबाचं फूल घेऊन सादरीकरण करताना दिसले. शहनाज इम्प्रेस करताना कॉमेडियन बलराज शर्टलेस झाला होता.

मुझसे शादी करोगे होतोय ट्रोल
मुझसे शादी करोगे शोचा प्रोमो व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर ट्रोल होताना दिसत आहे. अनेकांनी टीका करत हा शो बकवास आहे असं म्हटलं आहे. काहींनी हा शो घाणेरडा असल्याचंही म्हटलं आहे. काहींनी शो बंद करण्याचीही मागणी केली आहे. काहींनी तर मेकर्सवर अश्लीलता परसरवण्याचा आरोपही केल्याचं दिसत आहे.

वेळेआधीच बंद होणार का मुझसे शादी करोगे ?
अशी माहिती आहे की, मुझसे शादी करोगे रिअ‍ॅलिटी शो लवकरच बंद होण्याची शक्यता आहे. शोच्या फॉर्मेटवरून अनेकांनी सवाल उपस्थित केले आहेत. शोचे मेकर्स लवकरच हा शो ऑफ एअर करू शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. किंवा मग शोचा फॉर्मेट बदलला जाऊ शकतो ज्यानुसार शोमध्ये कोणाचंही लग्न होणार नाही. शो मध्ये कॉमिक अँगलवर जास्त फोकस केला जाणार आहे.