मुकेश आणि नीता अंबानी यांचे 32 वर्षापुर्वीचे फोटो आता आले समोर, पहा सर्व फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – देशातील सर्वात श्रीमंत कपल मुकेश अंबानी आणि नीता अंबानी गेल्या 32 वर्षांपासून सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत. अनेकदा हे कपल इव्हेंटमध्ये किंवा पार्टीत स्पॉट होताना दिसतं. अनेकदा दोघे लाईमलाईटमध्ये असतात. अशातच दोघांच्या लग्नाचे 32 वर्षांपू्र्वीचे काही फोटो फोटो समोर आले आहेत. नीता अंबाईनीच्या एका फॅन क्लबने हे फोटो शेअर केले आहेत सध्या हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

Mukesh Ambani Nita Ambani

एका फोटोत दिसत आहे की, मुकेश अंबानी यांच्यासोबत धीरूभाई अंबानी आणि कोकिलाबेनही दिसत आहे. मुकेश अंबानी यांना ग्रे कलरचा सूट घातला आहे. नीताही गोल्डन साडीमध्ये सुंदर दिसत आहेत. न्यूली मॅरिड कपल असतानाचे त्यांचे फोटो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

Mukesh Ambani Nita Ambani

नीता आणि मुकेश अंबानी यांच्या लग्नाच्या फोटोंसोबतच आपण त्यांच्या लवस्टोरीविषयीदेखील जाणून घेणार आहोत. एका मुलाखतीत बोलताना मुकेश आणि नीता यांनी आपल्या लवस्टोरीबद्दल सांगितले आहे. त्यावेळी नीता फक्त 20 वर्षांच्या होत्या आणि मुकेश 21 वर्षांचे होते. मुकेशचे वडिल धीरुभाई अंबानी यांना नीता खूप आवडल्या होत्या. त्यांनी नीताला पाहिल्यानंतरच सून बनवण्याचा विचार केला होता.

Mukesh Ambani Nita Ambani

नीता आणि मुकेश यांची एकमेकांसोबत ओळख झाल्यानंतर एकदा नीता आणि मुकेश कारमधून जात होते. त्याचवेळी मुकेश यांनी नीता यांना विचारलं की, “तू माझ्यासोबत लग्न करशील का ?” याचवेळी कार रेड सिग्नलला थांबली होती.Mukesh Ambani Nita Ambani

मुकेश म्हणाले की, “मी तोपर्यंत कार पुढे नेणार नाही जोपर्यंत तू उत्तर देणार नाहीस.” मागे उभ्या असणाऱ्या सर्वच गाड्या जोरजोरात हॉर्न वाजवत होत्या. परंतु मुकेश अंबानी नीताच्या उत्तराची वाट पहात होते. नीता यांनी काही वेळानंतर मुकेश अंबानी यांना होकार दिला. त्यानंतर मकेश यांना आपली कार पुढे नेली.

यानंतर नीता यांनी मुकेश यांना विचारले की, “जर मी नकार दिला असता तर तू मला कारमधून उतरवलं असतंस का ?” या प्रश्नावर मुकेश म्हणाले की, “नाही. मी असं कधीच नसतं केलं. मी तुला सुखरूप घरी सोडलं असतं.” यानंतरच नीता आणि मुकेश यांचं धुमधडाक्यात लग्न झालं.

Loading...
You might also like