योगी सरकारचा विजय ! गँगस्टर अन्सारीला पंजाबमधून यूपी तुरुंगात पाठवण्याचा SC चा आदेश

लखनऊ : वृत्तसंस्था – पंजाब येथील रोपड तुरुंगात असणारा गँगस्टर आणि नंतर नेता बनलेला मुख्तार अन्सारी अर्थात बाहुबली नेता याचा यूपीमध्ये खटला चालावा यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्याच्या आत पंजाबमधून उत्तर प्रदेश तुरुंगात पाठवण्याचा आदेश दिला आहे. हा आदेश शुक्रवारी देण्यात आला.
मुख्तार अन्सारीला आता प्रयागराजचे विशेष कोर्ट ठरवेल की, बांदा तुरुंगात ठेवायचं किंवा इतर कोणत्या तुरुंगात.

अन्सारीला २ आठवड्यांच्या आत UP सरकारला सुपूर्द केले जावे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने २ ट्रान्सफर याचिकांना सीझ केले होते. ज्यामध्ये एक म्हणजे यूपी सरकारकडून अन्सारीला पंजाबमधून यूपीमध्ये पाठवण्याची याचिका. आणि दुसरी अन्सारीने आपल्या विरोधातील खटला दिल्लीत ट्रान्सफर करण्याची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने अन्सारीच्या याचिकेला फेटाळून लावले. हा निर्देश न्या. भूषण आणि न्या.आर सुभाष रेड्डी यांच्या खंडपीठाने दिला आहे.

दरम्यान, आमदार मुख्तार अन्सारी यूपीतील एका तुरुंगात कैद होता आणि त्याच्याविरोधात खटला सुरु होता. त्यानंतर पंजाब येथील पोलिसांनी त्याच्याविरोधात वसुली आणि धमकी दिल्याप्रकरणी प्रोडक्सन वॉरंट मिळवलं होतं आणि त्याला पंजाबात आणलं होतं. गँगस्टर अन्सारीवरुन यूपी आणि पंजाब सरकारमध्ये वाद सुरु आहे. युपी सरकार याप्रकरणासाठी कोर्टात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे योगी सरकारचा विजय झाला आहे. तसेच यूपी सरकारकडून कोर्टामध्ये सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी ३ मार्चला सुनावणीवेळी म्हटलं की, अन्सारी पंजाबच्या रोपड तुरुगांतून आपले काळेधंदे करत आहे. पंजाब पोलिसांनी ज्या FIRच्या आधारावर अन्सारीला अटक केली, त्यामध्ये त्याचे नावे स्पष्टपणे लिहिण्यात आलेले नाही. तसेच मॅजिस्ट्रेटचे निर्देश नसताना बांदा तुरुंग अधीक्षकाने सोपवल्यानंतर पंजाबात अन्सारीला नेले गेले.