Mula Mutha Riverfront Development Project | मुळा- मुठा नदीकाठ सुधार योजना ! पहिल्या 2 टप्प्यांच्या निविदा आठवड्याभरात उघडणार; बाबा भिडे पूल काढणार, नदी पात्रातील रस्ता बंद होणार, गरवारे कॉलेज मागे पाणी अडवण्यासाठी ब्यारेज बांधणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुळा- मुठा नदी सुधार योजनेतील (Mula Mutha Riverfront Development Project) टप्पा क्र.९ आणि १० साठीच्या निविदा (Tender) अनुक्रमे ४ आणि ७ फेब्रुवारी उघडण्यात येणार आहेत. या दोन्ही टप्प्यांसाठी सुमारे एक हजार कोटी रुपये खर्च होणार असून यामध्ये संगमवाडी ते बंडगार्डन (Sangamwadi to Bundgarden) आणि बंडगार्डन ते मुंढवा (Bundgarden to Mundhwa) पर्यंतचे काम करण्यात येणार आहे. पुढील टप्प्यात औंध ते संगमवाडी (Aundh to Sangamwadi) आणि खडकवासला ते संगमवाडीचे (Khadakwasla to Sangamwadi) काम करण्यात येणार आहे. मात्र, हे काम करत असताना नदी पात्रातील बाबा भिडे पुलासह (Baba Bhide Bridge) सर्व कॉजवे काढावे लागणार असून नदी पात्रातील रस्ताही बंद होणार असल्याचे महापालिका (Pune Corporation) प्रशासनाने बुधवारी केलेल्या सादरीकरणातून स्पष्ट झाले आहे. (Mula Mutha Riverfront Development Project)

 

महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) , अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार (PMC Addl Commissioner Kunal Khemnar) , शहर अभियंता प्रशांत वाघमारे (City Engineer Prashant Waghmare), प्रकल्प अभियंता श्रीनिवास बोनाला (Project Engineer Srinivas Bonala) यांच्या उपस्थितीत आज प्रशासनाने मुळा- मुठा नदी काठ सुधार योजनेअंतर्गत (Mula Mutha Riverfront Development Project) महापालिकेच्या हद्दीतून वाहणार्या मुळा- मुठा नदीच्या ४४ कि.मी. लांबीच्या नदी काठाचे सुशोभीरकरण करण्याच्या सविस्तर अहवालाचे पत्रकारांसमोर सादरीकरण केले. सुमारे ११ टप्प्यात होणार्‍या ४ हजार ७०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाची सविस्तर माहिती आणि शंकांचे निरसनही अधिकार्‍यांनी यावेळी केले.

 

२०१६ पासून प्रकल्पावर काम सुरू

२०१६ पासून नदी काठ सुधार प्रकल्पाचे काम सुरू झाले. नदीचा व परिसराचा भौगोलिक आणि पर्यावरणीय सर्व्हे करण्यात आला. नदी काठ परिसरातील सुमारे ४ हजार ७०० नागरिकांची मते व अपेक्षा जाणून घेण्यात आल्या. तसेच १०० वर्षांत आलेल्या सर्व पुरांचा अभ्यास करून प्रकल्पाची आखणी, स्थायी समितीची मान्यता व विविध विभागांच्या मान्यता घेण्यात आल्याचे अधिकार्‍यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

उद्देश काय?

नदीत येणारे सांडपाणी, कचरा व अतिक्रमण रोखणे. पूराचे पाणी नागरी भागात जाणार नाही यासाठी नदीतील अडथळे कमी करणे. नदीची वहन क्षमता वाढविणे. पर्यावरणीयदृष्टया नदी पुर्नस्थापित करणे. नागरिकांनी नदीकडे यावे यासाठी मनोरंजनासाठी ठिकाणे, जॉगींग ट्रॅक, सायकल ट्रॅक, वनीकरण व सुशोभीकरण करणे.

 

काय करणार?

जायका कंपनीच्या (PMC JICA Project) सहकार्याने शहरात गोळा होणार्‍या सांडपाण्यावर प्रक्रिया (Sewage Treatment) करून नदीत सोडण्यात येणार आहे. सांडपाणी तसेच ओढे व नागझर्‍यांमधून येणारे पाणी एसटीपी प्लँन्टपर्यंत (PMC Water STP Plant) वाहून नेण्यासाठी दोन्ही तिरांवर स्वतंत्र वाहीन्या टाकणार. नदी सुधार आणि नदीकाठ सुधार या दोन्ही योजना एकाचवेळी राबविल्याने नदी काठचा विकास योग्य पद्धतीने सलग होण्यास मदत होणार. नदी काठावर असलेल्या ऐतिहासिक वास्तुंचे जतन आणि अनुरूप संवर्धन करण्याचा योजनेत समावेश. या प्रकल्पासाठी नदी काठावरील ६८ हेक्टर जागा उपलब्ध होणार असून यापैकी ७५ टक्क्यांहून अधिक जागेवर हिरवाई जपण्यात येईल.

 

तीन ठीकाणी बॅरेज बांधून पाणी आडविले जाणार

खडकी कॅन्टोंन्मेंट (Khadki Cantonment Board – KCB), बंडगार्डन (Bundgarden) येथे सध्या अस्तित्वातील बॅरेज आहेत. आणखी एक बॅरेज गरवारे कॉलेज मागील नदी पात्रात बांधण्यात येणार आहे. या बॅरेजमुळे नदीपात्रात एक ते दीड मिटर पाण्याची पातळी कायम राखली जाईल. यामुळे शहरातील बहुतेक नदी पात्रात कायम पाणी राहाण्यास मदत होणार आहे. या बॅरेजचे गेट खालील बाजुस राहाणार असून अखंडीत पाण्याचा प्रवाह राहील. तसेच गाळ कमीत कमी राहील.

 

कोणते अडथळे काढले जाणार?

मुठा नदी पात्रातील बाबा भिडे पूल, अमृतेश्‍वर घाटालगतचा कॉजवे, नांदेड – शिवणे (Nanded-Shivne) दरम्यानचा कॉजवे हा पुढील टप्प्यातील कामादरम्यान काढला जाणार आहे. याठिकाणी पुलांची उंची वाढविणे व तत्सम उपाययोजना महापालिकेला कराव्या लागणार आहेत. महापालिका भवन (Mahapalika Bhavan) मागील जयंतराव टिळक पुल ते म्हात्रे पुला दरम्यानचा रस्ता बंद करण्यात येणार आहे. नदी पात्रातील रस्ता बंद झाल्यानंतर छत्रपती संभाजी चौकीपासून केळकर रस्ता ते ओंकारेश्‍वर पर्यंतचा पर्यायी रस्ता विकसित करण्याचे नियोजन असून अन्य पर्यायांचाही विचार करण्यात आला आहे.

 

संगमवाडी ते बंडगार्डन व बंडगार्डन ते मुंढवा हे काम पहिल्या टप्प्यात करायचे नियोजन काय?

हा भाग मुळा- मुठा नदीचा एकत्रित भाग असून दोन्ही काठांवर फारशी बांधकामे झालेली नाहीत. या भागात नदीकाठावर मोठ्याप्रमाणावर वृक्षराजी आहे. बंडगार्डन येथे बॅरेज बांधलेले आहे. या भागात नैसर्गिकदृष्टया नदी पात्राची खोली मोठी असून भूसंपादनामध्ये फारसे अडथळे नाहीत. तसेच फारसा खर्चही येणार नाही. त्यामुळे गतीने काम करुन नागरिकांसमोर नदी प्रकल्पाचे आदर्श स्वरूप ठेवता येणार आहे. या टप्प्यामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला अस्तित्वातील रस्ते असून संगमवाडी ते बंडगार्डनपर्यंत विकास आराखडयामध्ये दर्शविलेल्या रस्त्याचा विकास करण्यात येईल.

 

नदी पात्रातील घाटांचे काय?

नदी पात्रालगत सध्याच्या घाटांमध्ये आणखी ५० नवीन घाट विकसित करण्यात येणार आहेत. नदी पात्रात उतरण्यासाठी सध्या ५० ठिकाणांहूनच रस्ते अथवा पायर्‍या आहेत. आखणी ५० ठिकाणी पायर्‍या व उतरण्याचे मार्ग तयार करण्यात येणार ओहत. ज्या ठिकाणी नदी काठावर कमी जागा मिळणार आहे, त्याठिकाणी नदी पात्राच्या कडेला भिंत उभारून साधारण ३० मीटर रुंदीचा भाग व वरिल ऍमेनिटी विकसित करण्यासाठी वापरण्यात येईल. प्रामुख्याने मुठा नदी पात्रात नागरीकरण झालेल्या भागात या भिंती उभाराव्या लागणार आहेत. नदी पात्राकडे जाण्यासाठी ३०० ते ५०० मीटर अंतरावर एन्ट्रन्सची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी रस्ते व अन्य पर्याय महापालिका उपलब्ध करून देणार.

 

पवना व मुळा नदीतून येणार्‍या सांडपाण्याचे काय?

पवना व मुळा नदीतून येणार्‍या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते नदीपात्रात सोडण्यासाठी
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून एसटीपी प्लँन्ट उभारण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
या प्रकल्पासाठी आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

 

पूररेषा बदलणार? व प्रकल्पाच्या मेन्टेनन्सचे काय?

पाटबंधारे विभागाने (Pune Irrigation Department) आखलेल्या ब्ल्यू लाईन (Blue Line) व रेड लाईनमध्ये (Raid Line) फारसे बदल होणार नाहीत.
काही ठिकाणी बदल करावा लागण्याची शक्यता आहे.
परंतू पहिल्या टप्प्यात निविदा काढलेल्या ठिकाणी सध्यातरी याची गरज भासणार नाही.
नदी काठचा विकास झाल्याने बाजूला असलेल्या मिळकतधारकांना फायदाच होणार आहे.
मिळकतींच्या किंमती वाढणार आहे. या प्रकल्पाचा दीर्घकालिन मेन्टेनन्स करण्यासाठी पॉलिसी
तयार करण्याचे काम ब्रिटनच्या एफसीडीयु या एजन्सीला देण्यात आले आहे.
ही पॉलिसी अंतिम करताना सर्वसाधारण सभेची (PMC General Body Meeting) मंजुरी घेण्यात येईल.

 

Web Title :- Mula Mutha Riverfront Development Project | Mula Mutha Riverfront Development Project ! Tenders for the first 2 rounds will open within a week; Baba Bhide bridge will be removed

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Parambir Singh | परमबीर सिंह यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर आरोप, शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

Pune Crime | पुण्यात 570 मूकबधिरांची फसवणूक ! सुयोग मेहता, अभिझर घोडनदीवाला, प्रदिप कोलते, चंचल मेहता, मिहिर गोखले, धनंजय जगताप यांना अटक

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 18,067 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी