Parambir Singh | परमबीर सिंह यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर आरोप, शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – 100 कोटी वसुली प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त (Mumbai Former CP) परमबीर सिंह (Parambir Singh) यांची उलट तपासणी सुरु आहे. या चौकशी दरम्यान परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या नावाचा उल्लेख केल्याने खळबळ उडाली आहे. परंतु ईडीच्या (ED) माध्यमातून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना बदनाम करण्याचं काम केलं जात आहे, अशी प्रतिक्रीय शिवसेनेचे नेते आणि उच्चतंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

 

उदय सामंत म्हणाले, परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी जे काही आरोप केले आहेत. त्यात काही तथ्य नाही. ईडीच्या चौकशीमध्ये कोण कोणाचं नाव घेतलं आहे मला माहिती नाही. परंतु ईडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना बदनाम करण्याचं काम केले जात आहे. म्हणून काही अधिकारी किंवा त्यांची बदनामी करण्याची सुपारीच घेतली होती, त्याचाच हा भाग असेल. पण ईडी संदर्भात एखादी संबंधीत यंत्रणा काम करत असताना यावर अधिक बोलणं योग्य नाही. परंतु उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना बदनाम करण्याचा डाव असल्याचे सामंत यांनी म्हटले.

नितेश राणेंना टोला
न्यायालयाचा आदर केला पाहिजे. न्यायालयात युक्तिवाद सुरु आहे. न्यायालय आपली कारवाई करणार आहे.
कोर्टासमोर तणावाचे वातावरण आहे. सगळ्यांनी संयमाने न्यायालयाचा आदेशाचा आदर केला पाहिजे.
गेल्या 8-15 दिवसांपासून जिल्हा न्यायालय (District Court), उच्च न्यायालय (High Court), सुप्रीम कोर्ट (Supreme Court)
आणि काल पुन्हा एकदा जिल्हा न्यायालय, यांनी निकाल दिले होते.
त्यात अधीन राहून नितेश राणे (Nitesh Rane) शरण केले असतील, असा टोला सामंत यांनी लगावला.

Web Title :- Parambir Singh | shivsena leader and minister uday samant on parambir singhs allegations against chief minister uddhav thackeray and aditya thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | आजीचा खून करुन नातवाने रचला घसरुन पडल्याचा बनाव, खूनाचा गुन्हा दाखल

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 18,067 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Pune Traffic Police | माघी गणेशोत्सव निमित्त शिवाजी रोडवरील वाहतूकीत बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग