‘मला मारहाण नाही धक्काबुक्की झाली’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन-मुळशी पॅटर्नचे दिग्दर्शक प्रविण तरडे यांना चार ते पाच जणांनी मारहाण करुन त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. मुळशी पॅटर्न मधील एका गाण्यामध्ये स्थानिक गुंड झळकल्याचं समोर आल्यापासून हे गाणं चर्चेचा विषय ठरलं आहे. प्रविण तरडे यांना मारहाण झाल्याचे सर्वात प्रथम पोलीसनामाने प्रसिद्ध केले होते. पोलीसनामाने बातमी प्रसिद्ध केल्यानंतर दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी कार्यालयाची तोडफोड करुन धक्काबुक्की केल्याची माहिती दिली आहे.

प्रविण तरडे यांनी लाईव्ह संभाषणात दिलेली प्रतिक्रीया त्यांच्याच शब्दात, आज जरा माझ्या ऑफिसला थोडीशी गडबड झाली होती. धक्काबुक्की, बाचाबाची झाली पण मी ठिक आहे. काही चॅनल्सवर बातम्या सुरु झाल्या आहेत. प्रविण तरडे यांना मारहाण करण्यात आली मात्र मी सुखरुप असून मला काहीही झाले नाही. थोड्यास्या गैर समजूतीतून हा प्रकार घडला असल्याचेही तरडे यांनी सांगितले आहे. तसेच हा गैरसमज लवकरच दूर करण्यात येईल. आणि हा चित्रपट रिलीज होईल त्यावेळी सर्वांचाच गैरसमज दूर होईल. झालेल्या प्रकारात कोणाचाही दोष नाही. ‘पोलीसनामा’ वर न्युज येत आहे ऑफीसची तोडफोड झाली. तशी गडबड झाली मात्र मी ठिक असून एका लाईव्ह कार्यक्रमासाठी मी आलो असल्याचे तरडे यांनी लाईव्ह संभाषणात सांगितले.

मराठी चित्रपटसृष्टीतील बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ठरत असेलेला चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना मारहाण करण्यात आली. गुन्हेगारी जगतावर भाष्य करणारा ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून हा चित्रपट गेल्या काही दिवसापासून सतत या ना त्या कारणाने चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यातच आज चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना काही अज्ञातांनी मारहाण करुन ऑफिसची तोडफोड केली. प्रविण तरडे यांच्या पौड रोडवरील कार्यालयात दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान घडली.

‘आरारा…’ हिट ‘मुळशी पॅटर्न’च्या दिग्दर्शकास बे’दम’ मारहाण