Multibagger IPO | ₹ 102 वरून 7500 रुपयांवर पोहोचला ‘या’ कंपनीचा शेअर, वर्षभरात रू. 90 लाख नफा, 7300% रिटर्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger IPO | हे वर्ष आयपीओ (IPO) साठी आतापर्यंत काही विशेष ठरले नाही. पण गेल्या वर्षी 2021 मध्ये अनेक कंपन्या लिस्ट झाल्या होत्या आणि त्यातून चांगला रिटर्न मिळाला होता. अशीच एक कंपनी म्हणजे ईकेआय एनर्जी सर्व्हिसेस (EKI energy services). 2021 मध्ये आयपीओ लाँच झाल्यापासून या कंपनीने तब्बल 7300% रिटर्न दिला आहे. (Multibagger IPO)

 

102 रुपये होती इश्यू प्राईस
ईकेआय एनर्जी सर्व्हिसेस (EKI Energy IPO) चा आयपीओ गेल्या वर्षी 2021 मध्ये आला होता. आयपीओ 24 मार्च रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आणि त्याचे लिस्टिंग एप्रिल 2021 मध्ये झाले. तो बीएसई एसएमई एक्सचेंज (BSE MSE) वर लिस्टेड होता. या आयपीओची इश्यू प्राईस 102 रुपये प्रति शेअर होती.

 

हा पब्लिक इश्यू त्याच्या लिस्टिंगच्या दिवशी 140 रुपयांच्या स्तरावर 37 टक्क्यांनी अधिक प्रीमियमसह खुला झाला. EKI energy services शेअरची आजची प्राईस रू. 7500 प्रति शेअर आहे. (Multibagger IPO)

 

गुंतवणूकदारांना झाला कोट्यवधीचा फायदा
या इश्यूसाठी एका लॉटमध्ये 1200 शेअर्स होते. अशावेळी गुंतवणूकदाराला या आयपीओमध्ये अर्ज करण्यासाठी रू. 1,22,400 ची गुंतवणूक करावी लागते. एखाद्या गुंतवणुकदाराने या मल्टीबॅगर आयपीओमधील आपली गुंतवणूक आतापर्यंत कायम ठेवली असती तर त्याचे रू. 1,22,400 आज रू. 90 लाख झाले असते.

 

Web Title :- Multibagger IPO | multibagger ipo eki energy services delivered 7300 percent return in one year

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | तब्बल 1 किलो सोनं व 3 किलो चांदीचे दागिने चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

 

Assembly Speaker Election | शिवसेनेकडून आमदारांना व्हिप जारी, एकनाथ शिंदे म्हणाले – ‘शिवसेनेचं व्हिप…’

 

RBI On Rs 500 Currency Note | 500 रुपयांच्या नोटांबाबत आरबीआयचे वक्तव्य, बँकांना दिले हे महत्वाचे निर्देश