Multibagger Penny Stock | 10 पैशांवरून 590.45 रुपयांवर पोहचला ‘हा’ शेयर, दिला 5 लाख टक्के जबरदस्त रिटर्न, 1 लाख रुपयांचे झाले 59 कोटी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Multibagger Penny Stock | जर तुम्हाला शेअर बाजारा (Stock Market) तून कमाई करायची असेल आणि मल्टीबॅगर स्टॉक (Multibagger stock) च्या शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला एका जबरदस्त स्टॉकबद्दल सांगणार आहोत. GRM Overseas असे या स्टॉकचे नाव आहे. बासमती तांदळाच्या (Basmati Rice) व्यवसायाशी संबंधित या कंपनीच्या बीएसईवर लिस्टेड स्टॉक (BSE Listed stock) ने 2004 पासून गुंतवणूकदारांना 5 लाख 90,350 टक्क्यांहून जास्त रिटर्न दिला आहे. त्याच वेळी, गेल्या एका वर्षात, या मल्टीबॅगर स्टॉकने 1,030 टक्क्यांहून जास्त रिटर्न (Stock return) दिला आहे. (Multibagger Penny Stock)

 

GRM Overseas च्या शेअरची किंमत
हा मल्टीबॅगर स्टॉक 1 ऑक्टोबर 2004 रोजी बीएसईवर 0.10 पैसे प्रति शेयरवरून 18 फेब्रुवारी 2022 रोजी 590.45 रुपये प्रति शेयरच्या पातळीवर पोहोचला. जीआरएम ओव्हरसीजच्या स्टॉकने या कालावधीत त्यांच्या गुंतवणूकदारांना 590,350 टक्क्यांपर्यंत जबरदस्त रिटर्न दिला आहे.

 

तब्बल 1,030.26 टक्के रिटर्न
त्याच वेळी, गेल्या पाच वर्षांत, हा शेयर 6.20 रुपयांवरून (2 मार्च 2017 बीएसईवर बंद किंमत) 590.45 रुपये प्रति शेअर झाला आहे. या कालावधीत, या शेयरने आपल्या शेयरधारकांना 9,423.39 टक्के रिटर्न दिला आहे. (Multibagger Penny Stock)

त्याच वेळी, एका वर्षापूर्वी या मल्टीबॅगर शेयरची किंमत 52.24 रुपये (19 फेब्रुवारी 2021 रोजी बीएसईवर बंद किंमत) होती. या एका वर्षात, त्याने आपल्या शेयरधारकांना 1,030.26 टक्के रिटर्न दिला आहे.

 

मार्केट एक्सपर्ट शेयरवर आजही बुलिश
6 महिन्यांपूर्वी 20 ऑगस्ट रोजी या स्टॉकची किंमत बीएसईवर 167.86 रुपये होती, त्यादरम्यान या स्टॉकने 251.75 टक्के रिटर्न दिला आहे. मात्र, गेल्या एका महिन्यापासून, कंपनीच्या शेयरवर विक्रीचा दबाव आहे आणि वर्ष – दर – वर्ष (YTD) आधारावर शेअर 9.92 टक्क्यांनी घसरला आहे. तरीही बाजारातील तज्ञ या शेयरबाबत उत्साही आहेत.

 

गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा फायदा

17 वर्षात 1 लाखाचे झाले 59.04 कोटी रुपये
जीआरएम ओव्हरसीज स्टॉकच्या किमती (GRM overseas stock price) च्या वाढीच्या इतिहासानुसार,
जर एखाद्या गुंतवणूकदाराने सुमारे 17 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती गुंतवणूक आतापर्यंत कायम ठेवली असती,
तर आज ही रक्कम 59.04 कोटी रुपये झाली असती.

 

5 वर्षात 1 लाखाचे झाले 95.23 लाख रुपये
5 वर्षांपूर्वी, जर एखाद्या गुंतवणूकदाराने या स्टॉकमध्ये 1 लाख गुंतवले असते,
तर आज ते 1 लाख रुपये 95.23 लाख झाले असते.

 

1 वर्षात 1 लाखाचे झाले 11.30 लाख रुपये
जर एखाद्या गुंतवणूकदाराने 1 वर्षापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते,
तर आज ही रक्कम 11.30 लाख रुपये झाली असती.

 

6 महिन्यात 1 लाखाचे झाले 3.52 लाख रुपये
तसेच एखाद्या गुंतवणुकदाराने 6 महिन्यांपूर्वी 1 लाख रूपये गुंतवले असते तर ही रक्कम 3.52 लाख रुपये झाली असती.

 

Web Title :- Multibagger Penny Stock | multibagger penny stock grm overseas given 5 lakh percent return 1 lakh turn to 59 crore rupees

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा