Narayan Rane | ‘दुसरा कोणी असता तर पदावर बसला नसता’; राणेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

पोलीसनामा ऑनलाइम टीम – Narayan Rane | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यांनी पत्रकार परिषद घेत अनेक धक्कादायक दावे केले आहेत. सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियानची हत्या झाल्याचं नारायण राणे (Narayan Rane) यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही प्रहार केला आहे.

 

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना जे काही मिळालं आहे ते बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) पुण्याईने मिळालं आहे. त्यांच्यामध्ये कोणतीही गुणवत्ता आणि पात्रता नसताना ते सव्वा दोन वर्षे मुख्यमंत्रीपदावर बसले आहेत. त्यांना स्वत:च्या पायावर उभं राहता येत नाही आणि उभं राहायचं असेल तर त्यांना दोन माणसे लागतात, मी कोणाच्या आजारपणावर बोलत नाही मात्र दुसरा कोणी माणूस असता तर त्या पदावर बसला असता, असं म्हणत नारायण राणेंनी (Narayan Rane) उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

 

माझ्याविरोधात आणि नितेशविरोधात सुडाचं राजकारण केलं आहे. स्वत: ला वाघ म्हणून घेणाऱ्यांना मांजरीचा आवाज का झोंबला?, आता मला मुंबई महापालिकेची नोटीस आली आहे ही तक्रार मुंबईतील कोणी नाही तर सिंधुदुर्गमधील एका खासदाराने केली असल्याचं म्हणत राणेंनी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्यावरही टीका केली.

 

दरम्यान, लोकांच्या विरोधात कपटकारस्थानं करणारं सरकार महाराष्ट्रात राहू नये अशी प्रार्थना मी आजच्या शिवजयंती (Shiva Jayanti) दिनी करत
असल्याचं राणे म्हणाले. राणेंनी केलेल्या या टीकेवर सरकारकडून काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Web Title :- Narayan Rane | union minister narayan rane slams cm uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 535 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Heart Failure | ‘या’ कारणांमुळे होते हार्ट फेल ! वाचण्यासाठी डॉक्टरांनी सांगितली सोपी पद्धत

 

Multibagger Stocks | रू. 14 च्या शेयरने 1 लाखांचे बनवले रू. 65 लाख! दिला 6,500% पेक्षा जास्त रिटर्न, तुम्ही खरेदी केला आहे का?