Multibagger Stock | ‘या’ कंपनीच्या शेयरने 10 वर्षात दिला तब्बल 8000 टक्के रिटर्न; 10 हजार रुपये झाले 8 लाख

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Multibagger Stock | शेयर बाजारातून कमाई करण्याचा सर्वात महत्वाचा गुण धैर्य आहे. मार्केट एक्सपर्टनुसार, एखाद्या शेयरमध्ये गुंतवणूक करताना गुंतवणुकदाराने कंपनीचे बिझनेस मॉडल आणि इंडस्ट्रीजची वाढ पाहिली पाहिजे. या दोन्ही गोष्टी जाणून घेतल्यानंतर गुंतवणुकदाराला बाय, होल्ड अँड फॉरगेट स्ट्रॅटेजी (buy, hold and forget strategy) मेंटेन ठेवली पाहिजे. (Multibagger Stock)

कारण दिर्घकालीन गुंतवणूक केल्याने गुंतवणुकदाराला आपल्या गुंतवणुकीवर कम्पाऊंडिंगचा बेनिफिट मिळतो. शेयर बाजारात धैर्य कशाप्रकारे रिटर्न देते याचे सर्वात ताजे उदाहरण आरती इंडस्ट्रीज (Aarti Industries) चा शेयर (stock) आहे.

30 सप्टेंबर 2011 ला आरती इंडस्ट्रीजच्या शेयरचा भाव 11.90 रुपये प्रति शेयर होता जो आज वाढून 945 रुपयांवर पोहचला. एका दशकता या कंपनीचा शेयर 80 पट वाढला आहे.

6 महिन्यात 42 टक्के वाढला शेयर
आरती इंडस्ट्रीजच्या शेयरने मागील 6 महिन्यात 42 टक्के रिटर्न दिला आहे. शेयर 658.37 रुपयांवरून वाढून 945 रुपयांच्या भावावर पोहचला. अशाच प्रकारे, केमिकल कंपनीचा हा शेयर मागील वर्षात 155.16 रुपयांवरून वाढून 945 रुपयांवर पोहचला. या दरम्यान सुमारे 500 टक्के मिळाला. (Multibagger Stock)

मागील 10 वर्षात स्टॉक 11.90 रुपयांच्या भावावरून उसळी घेत 945 रुपये प्रति शेयरवर आला. या दरम्यान शेयर 8000 टक्केच्या जवळपास वाढला.

 

1 लाख रुपये झाले 80 लाख

जर एखाद्या गुंतवणुकदाराने सहा महिने अगोदर केमिकल स्टॉक आरती इंडस्ट्रीजमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल,
तर त्याची रक्कम 1.42 लाख झाली असेल. जर गुंतवणुकदाराने या स्टॉकमध्ये एक वर्षापूर्वी 1 लाखाची गुंतवणूक केली
असती तर आज ही रक्कम 1.85 लाख रुपये झाली असती.
अशाप्रकारे, जर गुंतवणुकदाराने 5 वर्षापूर्वी आरती इंडस्ट्रीजच्या शेयरमध्ये 1 लाखाची गुंतवणूक केली असती,
तर ती रक्कम आज 6 लाख झाली असती.

एखाद्या गुंतवणुकदाराने 10वर्षापूर्वी 1 लाखाची गुंतवणूक केली असती तर आज त्याची एकुण रक्कम 80 लाख झाली असती.
मात्र, स्टॉक मागील एक महिन्यापासून विक्रीच्या दबावात आहे.
स्टॉक तज्ज्ञांचा सल्ला आहे की, सध्याच्या स्तरावर हा मल्टीबॅगर खरेदी करणे आदर्श आहे.
कारण तो अजूनही 900 रुपयांच्या ब्रेकआऊटच्या वर आहे.

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे.
येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे.
गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

Web Title :- Multibagger Stock | multibagger stock aarti industries shares rose up to 8000 percent in one decade rs 10000 become rs 8 lakhs

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Multibagger Stock | केवळ 12 रुपयाचा शेयर आता 945 वर पोहचला, 1 लाखाचे झाले 80 लाख रुपये

Uddhav Thackeray | … म्हणून भाजप खासदाराने मानले CM उद्धव ठाकरे यांचे आभार

Ajit Pawar | ‘या’ कारणामुळं पुण्यात होतोय लसीच्या सुयांचा तुटवडा – अजित पवार (व्हिडीओ)