Multibagger Stock | 2.50 रुपयांवरून 130 वर आला टाटा ग्रुपचा ‘हा’ स्टॉक, 2 वर्षांमध्ये 1 लाख रुपयांचे झाले 50 लाख

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Stock | टाटा समूहाच्या (Tata Group) एका पेनी स्टॉकने जबरदस्त रिटर्न दिला आहे. हा शेअर टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेड (TTML) चा आहे. कंपनीचा शेअर केवळ 2 वर्षात 2.50 रुपयांवरून 130 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअरनी गुंतवणूकदारांना 4,900 टक्क्यांहून जास्त रिटर्न दिला आहे. TTML शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांक रु. 12.30 आहे. त्याच वेळी, शेअरची 52 आठवड्यांची हाय लेव्हल 290.15 रुपये आहे. (Multibagger Stock)

 

1 लाख रुपयाचे झाले 50 लाखांपेक्षा जास्त
30 एप्रिल 2020 रोजी टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेड (टीटीएमएल) चा शेअर नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) वर 2.50 च्या पातळीवर होता. 5 मे 2022 रोजी कंपनीचा शेअर एनएसईवर 130.60 रुपयांच्या पातळीवर होता.

जर एखाद्या व्यक्तीने 2 वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि आपली गुंतवणूक तशीच ठेवली असती, तर आता हे पैसे 52.24 लाख रुपयांच्या जवळपास गेले असते. टीटीएमएलच्या शेअरनी गेल्या एका महिन्यात सुमारे 32% निगेटिव्ह रिटर्न दिला आहे. (Multibagger Stock)

एका वर्षात 900% पेक्षा जास्त रिटर्न
Tata Teleservices (Maharashtra) Limited (TTML) च्या शेअरनी गेल्या एका वर्षात 932 टक्के रिटर्न दिला आहे. 5 मे 2021 रोजी कंपनीचा शेअर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर 12.75 रुपयांच्या पातळीवर होता. 5 मे 2022 रोजी कंपनीचा शेअर 130.60 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता.

जर एखाद्या व्यक्तीने बरोबर 1 वर्षापूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आता ते पैसे 10 लाखांपेक्षा जास्त झाले असते. टीटीएमएलच्या शेअरनी गेल्या 6 महिन्यांत गुंतवणूकदारांना सुमारे 97 टक्के रिटर्न दिला आहे. त्याच वेळी, या वर्षात आतापर्यंत कंपनीच्या शेअरनी 39 टक्के निगेटिव्ह रिटर्न दिला आहे.

 

Web Title :-  Multibagger Stock | ttml turned 1 lakh rupee investment into 50 lakh in just 2 year

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा