Pune Crime News | ओंकार बाणखेले खुन प्रकरणातील मुख्य आरोपी आणि दुहेरी मोक्क्यातील टोळी प्रमुख सुधीर थोरात याला जामीन मंजुर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील सराईत गुन्हेगार (Criminal) ओंकार उर्फ राण्या बाणखेले (Omkar alias Ranya Bankhele Murder Case) याची गोळ्या झाडून हत्या (Firing) केल्या प्रकरणी या गुन्ह्यातील 9 आरोपींविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई (MCOCA Action) करण्यात आली होती. त्याप्रकरणी विशेष न्यायाधीश एस. बी. साळुंखे (Special Judge S. B. Salunkhe) यांनी टोळीप्रमुख आरोपी पवन सुधीर थोरात (Pawan Sudhir Thorat) याचा जामीन मंजूर (Bail Granted) केला आहे. आरोपीने ॲड. जितेंद्र सावंत (Adv. Jitendra Sawant), ॲड. वैभव मेदणकर (Adv. Vaibhav Medankar) व ॲड. प्रसाद जिचकार (Adv. Prasad Jichkar) यांच्यामार्फत जामीनासाठी अर्ज केला होता. (Pune Crime News)

याबाबत माहिती अशी की, सिद्धू मूसेवाला खुन प्रकरणातील (Sidhu Moosewala Murder Case) संशयित आरोपी संतोष जाधव (Santosh Jadhav) हा पवन थोरात टोळीतील सदस्य असल्याचे पोलिसांनी दोषारोपत्रामध्ये नमूद केले आहे. संतोष जाधव याने त्याच्या सोशल मीडियावर ‘सूर्य उगवायच्या आत तुला संपवतो’ असं स्टेटस ठेवलं होतं. त्यावरून ओंकार ऊर्फ राण्या अण्णासाहेब बाणखेले याने त्याच्या सोशल मीडियावर त्यास प्रत्युत्तर म्हणून स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून 3 अज्ञातांनी एकलहरे गावाच्या हद्दीत सुलतानपुर रस्त्यावर मोटारसायकलवरून येऊन ओंकार ऊर्फ राण्या अण्णासाहेब बाणखेले याच्यावर भरदुपारी गोळीबार करुन हत्या केली गेली. याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात (Manchar Police Station) दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता.

आरोपी पवन थोरात विरुद्ध कबुलीजबाब वगळता इतर कुठलाही प्रथमदर्शनी पुरावा नसून,
सहआरोपींचा जामीन झाला असल्याचा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला.
सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून विशेष मोक्का कोर्टाने (MCOCA Special Court) जामीन मंजूर केला आहे.

सदरील आरोपी विरुद्ध कुख्यात गुंड राहुल उर्फ पप्पू कल्याण वाडेकर (Rahul alias Pappu Kalyan Wadekar)
हत्ये प्रकरणी सुद्धा महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत खेड पोलिस स्टेशन (Khed Police Station)
येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी आरोपी पवन थोरात याने वकीलांमार्फत जामीन अर्ज
केला होता व त्याला अगोदरच जामीन झाला होता.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political News | … तर राजकारणात सक्रिय व्हायला तयार, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव जय पवारांचे राजकारणात येण्याचे संकेत

NCP | राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसे, पक्षातील फुटीनंतर शरद पवार गटाकडून नियुक्ती