मुंबईत चार मजली इमारत कोळसली, ४२ ते ४५ जण अडकल्याची भिती

मुंबई : वृत्‍तसंस्था – मुंबईतील डोंगरी परिसरातील एक चार मजली इमारत कोसळली असून यामध्ये जवळपास 42 ते 45 जण अडकल्याची भिती व्यक्‍त करण्यात आली आहे. घटना घडल्याघडल्या अग्‍नीशमन दलाच्या गाडया घटनास्थळी रवाना झाल्या असून बचावकार्यास सुरवात करण्यात आली आहे.
अचानकपणे चार मजली इमारतच कोसळल्याने जिवीत हानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. डोंगरी भागातील तांडेल स्ट्रीटवरील कौसरबाग बिल्डींग असं या चार मजली इमारतीचं नाव आहे.

पोलिस, अग्‍नीशमन दलाकडून बचावकार्यास सुरवात करण्यात आली असून एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे. इमारत कोसळल्यानंतर ढिगार्‍याखाली अनेकजण अडकल्याची भिती व्यक्‍त करण्यात येत असली तरी साधारण 42 ते 45 जण अडकल्याची भिती सध्यातरी व्यक्‍त करण्यात आली आहे. चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळल्याने ही घटना घडली आहे. परिसरातील लोकप्रतिनिधी तसेच स्वयंसेवी संस्थेतील कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असुन बचावकार्यास सुरवात झाली आहे.

सविस्तर वृत्‍त लवकरच

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like